शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेला हक्काचा निवारा द्या!

By admin | Updated: February 9, 2017 01:43 IST

शासकीय घरकूल योजनेंतर्गत मंजूर होऊन बांधकाम पूर्ण झालेल्या घरावर अन्य महिलेने अनधिकृतरित्या ताबा घेऊन घर बळकाविले.

तहसीलदारांचे निर्देश : लोकमतच्या वृत्ताची दखल सिरोंचा : शासकीय घरकूल योजनेंतर्गत मंजूर होऊन बांधकाम पूर्ण झालेल्या घरावर अन्य महिलेने अनधिकृतरित्या ताबा घेऊन घर बळकाविले. त्यामुळे बेघर झालेल्या सिरोंचा मालगुजारी क्षेत्रातील लक्ष्मी व्यंकटेश कुंदारपू या निराधार महिलेने तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदारांनी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून अन्यायग्रस्त महिलेला हक्काचा निवारा मिळवून देण्यास सांगितले आहे. शिवाय केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महसूल विभागाला अवगत करण्यासही सूचित केले आहे. लक्ष्मी कुंदारपू यांचे पती व्यंकटेश किष्टय्या कुंदारपू हयात असताना १९९७ मध्ये आर्थिदकृष्ट्या दुर्बल घटक योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले. घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर सभापती, सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांच्या समक्ष घराचा ताबा दिला तेव्हापासून कुंदारपू कुुटुंब सलगपणे या घरात वास्तव्यास होते. दरम्यान लक्ष्मी कुंदारपू यांचे पती व्यंकटेश यांचे निधन झाले. उपजीविकेसाठी लहान मुलांसह लक्ष्मी माहेरी निघून गेली. तिच्या गैरहजेरीत तेलंगणा राज्यातील जयश्री तिरूपती रौतू या दुसऱ्या महिलेने संबंधित घरावर अवैधरित्या कब्जा केला. सुरूवातीला एक ते दोनदा जयश्रीने घरावरील ताबा सोडत असल्याचे सांगितले होते. परंतु काही कालावधीनंतर तिने घरावरील ताबा सोडण्यास नकार दिला होता. याबाबत लक्ष्मीने आक्षेप घेऊन घर रिकामे करण्यास सांगितले असता, जयश्रीने घर सोडण्यास नकार दिला. लक्ष्मी व लहान मुले स्वत:च्या निवाऱ्यापासून वंचित आहेत. शासकीय घराचा गृहकर, नमुना आठ, पाणीकर, रेशनकार्डसह कायम वास्तव्याचा पत्ता अद्यापही लक्ष्मी व्यंकटेश कुंदारपू यांच्याच नावे आहे. याबाबत लोकमतने २९ डिसेंबर २०१६ ला वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल तहसीलदार व तालुका दंडाधिकारी अशोक कुमरे यांनी घेतली. कुमरे यांनी सिरोंचा नगर पंचायतीला पत्र पाठवून अन्यायग्रस्त महिलेला तिचे स्वत:चे घर उपलब्ध करून द्यावे, असे सांगितले आहे. (तालुका प्रतिनिधी)