लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गडचिरोलीत १४२ भूखंड देण्यात आलेले आहेत. त्यांना रमाई व शबरी घरकूल योजनेतून प्राधान्याने घरे द्यावी, जेणेकरून इतरांना आत्मसमर्पणाची प्रेरणा मिळेल, असे निर्देश गृह (ग्रामीण) तसेच वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी येथे अधिकाºयांना दिले.एक दिवसाच्या गडचिरोली दौºयात केसरकर यांनी गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस महासंचालक कनकरत्नम, पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक तसेच पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, गोंदियाचे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी बिपिन इटनकर आदींसह इतर प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते.नक्षल चळवळीपासून दूर जाऊन आत्मसमर्पण केलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने आवश्यक ती कार्यवाही करावी, असेही केसरकर यावेळी म्हणाले. आवश्यकता भासल्यास त्यासंदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी यावेळी दिले. शरण आलेल्या नक्षलवाद्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यांना कर्जावर वाहन देण्याची योजना आहे. त्याऐवजी राज्यातील शासकीय कार्यालयाची निर्लेखित वाहने योग्य त्या दुरूस्तीनंतर त्यांना देता येतील, असे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले. या बैठकीत नक्षल घडामोडी आणि त्यावरील उपाय याबद्दल दोन्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना सरकारी योजनेतून घरे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:35 IST
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना गडचिरोलीत १४२ भूखंड देण्यात आलेले आहेत. त्यांना रमाई व शबरी घरकूल योजनेतून प्राधान्याने घरे द्यावी, जेणेकरून इतरांना आत्मसमर्पणाची प्रेरणा मिळेल,.....
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना सरकारी योजनेतून घरे द्या
ठळक मुद्देगृहराज्यमंत्र्यांचे निर्देश : नक्षलग्रस्त जिल्ह्यांचा आढावा