शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्कधारकांना सातबारा द्या

By admin | Updated: October 25, 2015 01:15 IST

तालुक्यातील शेकडो नागरिकांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत त्यांना सातबारा देण्यात आला नाही.

भामरागड तहसीलसमोर आंदोलन : जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा निर्माण समितीची मागणीभामरागड : तालुक्यातील शेकडो नागरिकांना वनपट्ट्यांचे वाटप करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत त्यांना सातबारा देण्यात आला नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास अडचण होत आहे. तहसीलदारांनी याबाबीकडे लक्ष घालून सातबारा द्यावा, त्याचबरोबर तालुक्यातील इतरही समस्या सोडवाव्या आदी मागण्यांसाठी जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा निर्माण समिती एटापल्ली यांच्या मार्फतीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन सादर केले.भामरागड तालुक्यातील वैयक्तिक व सामुहिक वनहक्क पट्ट्यांचे वितरण तत्काळ करावे, प्रलंबित वनहक्क प्रस्तावांवर तत्काळ निर्णय घेऊन २५ ते ४० दिवसांत वनहक्क प्रदान करावे, वनहक्क धारकांना सातबारा द्यावा, भारतीय संविधानातील पाचव्या व सहाव्या अनुसूचीनुसार गौण व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीवर ग्रामसभांना १०० टक्के मालकीहक्क प्रदान करावे, लोहखनिज संबंधित व लगतच्या ग्रामसभांना ६ टक्के मालकी हक्क व उर्वरित मालकीहक्क पंचायत समिती, जिल्हा परिषद, राज्य सरकार व केंद्र सरकार यांना योग्य प्रमाणात देण्यात यावे, पेसाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करावे, १९ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, सूरजागड व दमकोंडवाही तसेच अन्य पहाडावरील लोहखनिजाचे उत्खनन करण्याचे व कच्च्या मालाचे एटापल्ली, अहेरी उपविभागाच्या बाहेर वाहतूक करून या जिल्ह्याच्या खनिज संपत्तीची लूट करण्याची खासगी कंपन्यांना लिज देवू नये, शासन स्वत: लोहखनिजाचे उत्खनन करण्यास असमर्थ असेल तर लोहखनिज उत्खननाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात यावे, कसनसूर, जारावंडी, पेंढरी, गट्टा, तागडगाव, लाहेरी, जिमलगट्टा, आष्टी या तालुक्यासह अहेरी जिल्हा निर्माण करण्यात यावा, नवीन ग्राम पंचायत व तलाठी साजे निर्माण करावे, पूर्व महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ राज्य निर्माण करावा, कसनसूर, जारावंडी येथे टॉवर उभे करून मोबाईल सेवा सुरू करावी, भामरागड तालुक्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे संयोजक सुरेश बारसागडे, जनहितवादी युवा समितीचे सहसचिव राहुल धोंगडे, राजू गोटा आदी उपस्थित होते. सदर निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनासुद्धा पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)