शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

जमीन वर्ग १ करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्या!

By admin | Updated: April 13, 2017 02:32 IST

वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याचे अधिकार सद्य:स्थितीत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत.

पंचायत समिती आमसभेत ठराव : आमदारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभा गडचिरोली : वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याचे अधिकार सद्य:स्थितीत उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहेत. मात्र बहुतांश उपविभागीय अधिकारी आयएसएस दर्जाचे व पश्चिम महाराष्ट्रातील राहतात. त्यांना विदर्भातील जमीन कायद्याचा अभ्यास राहत नाही. त्यामुळे वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याचे अनेक दावे ते चुकीच्या पद्धतीने फेटाळून लावतात. जमीन वर्ग १ करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात यावे, अशा प्रकारचा ठराव गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेत घेण्यात आला. या सभेला पंचायत समितीच्या सभापती दुर्लभा बांबोळे अनुपस्थित होत्या. स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये बुधवारी पंचायत समितीची वार्षिक आमसभा आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेला पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, तहसीलदार संतोष खांडरे, मुख्याधिकारी कृष्णा निपाने, संवर्ग विकास अधिकारी पचारे, नगरसेवक रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, पं. स. सदस्य मालता मडावी, जान्हवी भोयर, सुषमा मेश्राम, रामरतन गोहणे, मारोतराव इचोडकर, नेताजी गावतुरे यांच्यासह अधिकारीवर्ग उपस्थित होते. २०१५-१६ या वर्षात झालेल्या आमसभेतील ठरावाचे अनुपालन झाले किंवा नाही, याबाबत चर्चा केली. राजस्व विभागाअंतर्गत १९५४-५५ मध्ये बंदोबस्तात ज्या शेतकऱ्यांना जमिनी देण्यात आल्या होत्या, त्या सर्व जमिनी वर्ग १ करण्यात याव्या, यासंदर्भातील ठराव पारित करण्यात आला होता. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, असे अनुपालन अहवालात लिहण्यात आले होते. मात्र वाकडी येथील ऋषी जयराम भोयर यांनी चार वर्ष झाले, मात्र आपली जमीन वर्ग १ करण्यात आली नाही. अनेकवेळा त्रूटी दाखविण्यात आल्या. या त्रूटी पूर्णही करण्यात आल्या. तरीही जमीन वर्ग १ करण्यात आली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी तत्कालीन सीपी अ‍ॅण्ड बेरारच्या काळात शासनाकडून शेतकऱ्यांना विनाअट जमिनी देण्यात आल्या. या सर्व जमिनी वर्ग १ करायचे आहेत. मात्र १९६६ च्या मुंबई जमीन महसूल अ‍ॅक्टमध्ये १९५४-५५ पूर्वी ज्या जमिनी वितरित झाल्या आहेत, अशा जमिनी वर्ग १ करण्याचा कायदा सरकारने केला आहे. मात्र विदर्भातील ज्या जमिनी १९५७-५८ नंतरही वितरित झाल्या आहेत. त्याही वर्ग १ करता येते. मात्र आयएसएस दर्जाचे अधिकारी कायद्याचा बरोबर अभ्यास करीत नाही. अनेक शेतकऱ्यांनी आयुक्तांकडून वर्ग १ करण्याचे आॅर्डर आणले आहेत. मात्र येथील एसडीओ कौस्तुभ दिवेगावकर आयुक्तांचाही आदेश मानत नाही. परिणामी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. वर्ग १ च्या जमिनी करण्याला गती देण्यासाठी हे अधिकार तहसीलदारांना देण्याचा ठराव घेण्यात आला. गडचिरोली शहरातील नागरिकांना पूर्वीप्रमाणेच तलाठ्यानेच उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे, असाही ठराव सभेत घेण्यात आला. दर्शनी माल येथील ग्रामसेवक नियमितपणे उपस्थित राहत नाही. ही बाब तेथील सरपंचांनी लक्षात आणून दिली असता प्रत्येक सोमवारी तसेच आठवड्याचे काही दिवस ठरवून देण्याचे आश्वासन संवर्ग विकास अधिकारी यांनी दिले. वाकडी येथील ११ हेक्टर जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यापैकी २५ टक्के शिल्लक जागा गरजू व्यक्तींना घरासाठी देण्यात यावे, बोदली घाटातून रेतीचे अवैध उत्खनन सुरूच आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी महसूल विभागाने उपाययोजना करावी, असा ठराव घेण्यात आला. आमसभेचे प्रास्ताविक संवर्ग विकास अधिकारी पचारे तर संचालन विस्तार अधिकारी रतन शेंडे यांनी मानले. तालुक्यातील सरपंचांचा आमसभेवर बहिष्कार आमदार डॉ. देवराव होळी हे सरपंच, लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिकांचे ऐकून न घेता अधिकाऱ्यांच्याच बाजूने बोलतात. एखाद्या सरपंचाने मुद्दा उपस्थित केल्यानंतरही त्या मुद्याचे उत्तर अधिकाऱ्याकडून येण्यापूर्वीच पुढील चर्चेला सुरुवात केली जात होती, असा आरोप करीत मारोडा येथील ज्ञानेश्वरी मडावी, जमगावच्या वच्छला नरोटे, शिवणीच्या शिला कन्नाके, हिरापूरच्या माधुरी कांबळे, बामणीच्या वंदना राऊत, मुडझाच्या कल्पना सुरपाम, जेप्राच्या गुणवंत जम्बेवार, ठेंभाच्या ज्ञानेश्वरी बानबले, बोदलीचे सरपंच आकाश निकोडे, चांदाळाचे राजेंद्र मेश्राम, खरपुंडीचे कमलेश खोब्रागडे, येवलीच्या योगीता सोमनकर, चुरचुरा मालचे उमेश शेंडे, गुरवळाच्या निशा आयदुलवार व हिरापूरचे उपसरपंच दिवाकर निसार यांनी आमसभेवर बहिष्कार टाकला.