शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांना पदोन्नतीचा लाभ द्या- सिरसाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 01:36 IST

आॅक्झलरी नर्स मिडवायफरीचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी,

गडचिरोली : आॅक्झलरी नर्स मिडवायफरीचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परिचारिकांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्षा माया सिरसाट यांनी केली आहे. १९८५ ते १९८८ पर्यंत आॅक्झलरी नर्स मिडवायफरी ट्रेनिंग एक वर्षाचे होते. १९८५ पर्यंत ज्यांनी एक वर्षाचे ट्रेनिंग पास करून जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती मिळाली, त्यांना पुन्हा सहा महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण केल्याशिवाय १२ वर्षांची कालबद्ध पदोन्नती देण्यात येणार नाही, असे शासनाचे म्हणणे होते. त्यानुसार अनेक परिचारिकांनी सहा महिन्याचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात केले. शासनाची वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने कालबद्ध पदोन्नती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे नर्सेस संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती दाखल केली. त्यानुसार शासनाने ७ आॅक्टोबर २०१६ रोजी शासन निर्णय घेऊन नर्सेसचे ट्रेनिंग एक वर्षाचे असो वा दीड वर्षाचे असो त्यांना सेवेत रूजू झाल्यापासून १२ वर्ष व २४ वर्षाची कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी, असे म्हटले आहे. ज्या नर्सेसकडून वेतनाची वसुली केली आहे, ती शासनाने परत करावी व सरसकट नियुक्ती दिनांकापासून कालबद्ध पदोन्नती लागू करावी. शासननिर्णयाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष माया सिरसाट, सचिव ज्योती काबरे, कल्पना रामटेके, उईके, मानकर, कुमरे, राळेकर, वनस्कर, सुपारे, यादव, बावणे, राठोड, पांडे, पेशट्टीवार, पेंदाम, पोटावी, निलमवार, सेलोकर, गोगे, कुलसंगे, आसमवार, गजलवार, वासनिक, बावनकर यांच्यासह नर्सेस संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)