शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘कुलगुरू’ पद ओबीसींना द्या

By admin | Updated: July 31, 2014 00:02 IST

गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे

रिक्त पद त्वरित भरा : राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची मागणीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार सेवानिवृत्त झाल्याने चार ते पाच महिन्यांपासून कुलगुरूचे पद रिक्त आहे. सध्य:स्थितीत कुलगुरू पदाचा कार्यभार गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. परंतु जिल्हाधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असल्याने विद्यापीठाच्या कामात अधिकाधिक वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठातील अनेक कामे वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. विद्यापीठातील रिक्त असलेले कुलगुरूचे पद भरतांना जिल्ह्यातील ओबीसींना प्राधान्य देऊन कुलगुरूपदी ओबीसीची नियुक्ती करावी व रिक्त असलेले पद भरावे, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातू केली आहे.गडचिरोली-चंद्रपूर हे दोन्ही जिल्हे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत मागासलेले आहेत. जिल्ह्यातील तिनही आमदार आदिवासी आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुसंख्य अधिकारी आदिवासी संवर्गाचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाला पुरेशा प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळत नाही. परिणामी ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ओबीसींना शासकीय नोकरी व इतर कामात पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नसल्याने ओबीसी समाजाचा विकास खुंटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजात नैराश्य पसरले आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजात अनेक तज्ज्ञ, उच्च विद्याविभूषित लोक आहेत. याबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक परिस्थितीची जाण असणारे अनेक प्राध्यापक, डॉक्टरेट पदव्या प्राप्त करणारीही मंडळी भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे गुणवत्तेनुसार गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती होण्यास जिल्ह्यातील ओबीसी समाजातील अनेक उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे कुलगुरूचे रिक्त पद भरतांना ओबीसी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, असेही चलाख यांनी म्हटले आहे. प्रथम कुलगुरूपदी जिल्ह्यातील ओबीसी समाजातील उमेदवाराची नियुक्ती व्हावी, यासाठी ओबीसी बहुजन महासंघाच्यावतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली होती. मात्र काही समाजाच्या राजकारण्यांनी ओबीसी समाजाची मागणी धुडकावून लावली होती. गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसी उमेदवाराची नियुक्ती केल्यास संपूर्ण ओबीसी समाजासह इतर समाजालाही न्याय मिळू शकतो. विद्यापीठात नवनवीन अभ्यासक्रम लागू करण्यासाठी अभ्यासू व्यक्तीची कुलगुरूपदी निवड होणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा विकास शिक्षणातूनच होऊ शकतो. यासाठी विद्यापीठ सक्षम असणे आवश्यक आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी ओबीसींची नियुक्ती करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष एम. डी. चलाख यांनी केली आहे.