जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : केंद्र सरकारकडे मागणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : कर्मचारी निवृत्त पेंशन योजना १९९५ च्या पेंशनधारकांना भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार मासिक पेंशन तीन हजार रूपये व केंद्र शासनाच्या प्रचलित दराने महागाई भत्ता लागू करून एकत्रित पेंशन देण्यात यावे, अशी मागणी पेंशनधारकांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रीय समन्वय समिती नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार पेंशनधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेंशनधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना समन्वय समितीचे अध्यक्ष शनिवारे, उपाध्यक्ष श्यामराव आचला, यादवराव खरवडे, एम.एस. केदार, चापले, माणिक मडावी, डी. व्ही. मसराम, पांडुरंग गोवर्धन, नत्थूजी चिमुरकर, एम. एम. उईके, डी. डी. सिडाम, वसाके आदी पेंशनधारक सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार पेंशन द्या
By admin | Updated: July 2, 2017 01:52 IST