शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

गडचिरोलीला वैद्यकीय महाविद्यालय द्या

By admin | Updated: February 15, 2015 01:10 IST

राज्य शासनाने चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने चंद्रपुरातील प्रस्तावित ...

गडचिरोली : राज्य शासनाने चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने चंद्रपुरातील प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर महाविद्यालय पूर्व विदर्भात मागास गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे.गडचिरोली हा देशातील मागास जिल्हा आहे. या जिल्ह्यात अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. यामध्ये वैद्यकीय तसेच आरोग्यविषयी सोयीसुविधांचाही अभाव प्रकर्षाने दिसून येत आहे. गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी २०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. या शिवाय २०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय पूर्णपणे उभे झाले आहे. लवकरच या रुग्णालयातून आरोग्य सेवाही सुरू होईल. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३३ पदे रिक्त आहेत. गडचिरोली येथे वैद्यकीय शिक्षणाची व्यवस्था निर्माण झाल्यास या जिल्ह्यातील तरूण वैद्यकीय शिक्षण घेऊन जिल्ह्यातच आरोग्य सेवा देऊ शकतील. राज्याच्या इतर भागातून वैद्यकीय अधिकारी येथे येण्यास तयार होत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करून जिल्ह्याला डॉक्टर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देता येऊ शकते. वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी जमीनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. शिवाय गोंडवाना विद्यापीठांतर्गत एकही वैद्यकीय महाविद्यालय दोन्ही जिल्ह्यात अस्तित्वात नाही. त्यामुळे गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जिल्हावासीयांनी केली आहे.गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास येथील आरोग्य सेवेलाही मोठी बळकटी मिळण्यास मदत होईल. येथील आरोग्य सेवा दर्जेदार स्वरूपाची करण्यासही मदत होईल. जिल्ह्यातील खासदार व आमदारांनी राज्य शासनाकडे या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेने केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या लोकबिरादरी प्रकल्पात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे. अनेक दुर्धर आजाराचे रूग्ण येथे उपचारासाठी येतात. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आव्हानात्मक व्याधीचे रुग्ण तपासण्याची मोठी संधी उपलब्ध होऊ शकते.गोंडवाना विद्यापीठ येथे आहे. या विद्यापीठांतर्गत एकही वैद्यकीय महाविद्यालय नाही. गडचिरोली या मागास जिल्ह्यात खासगी व सरकारी नर्सिंग कॉलेजेस सुरू आहेत. चंद्रपूरचा प्रस्ताव राज्य सरकारने नाकारला असल्यामुळे गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय शासनाने सुरू केल्यास मागास जिल्ह्याला न्याय मिळेल.वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास येथे तज्ज्ञ डॉक्टरही या निमित्ताने येतील. येथे पोलीस विभागाचे स्वतंत्र रुग्णालय आहे. मात्र आणिबाणीच्या परिस्थितीत नागपुरात जखमी पोलिसांवर उपचार केले जातात. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता व सुविधांचा अभाव हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. महाविद्यालय झाल्यास हा प्रश्नही निकाली निघेल.