शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:59 IST

तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन सादर : दुर्गम भागातील शेतकरी उपविभागीय कार्यालयावर धडकले

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या दुर्गम भागातील विविध गावांत आम्हच्या पूर्वजांनी तीन पिढ्यांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती केली आहे. महसूल व वन विभागाने काही लोकांचे नोंदी व पिवार तयार केले आहेत. मात्र आम्हाला अद्यापही वन जमिनीचे पट्टे मिळाले नाही. त्यामुळे शासकीय सोयीसुविधांचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे आम्हा अतिक्रमणधारकांना तत्काळ वन जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशी मागणी अतिक्रमणधारक शेतकºयांनी केली आहे.या संदर्भात अतिक्रमणधारक शेतकºयांनी सोमवारी थेट एटापल्ली येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. व उपविभागीय अधिकाºयांना लेखी निवेदन दिले. मागण्यांचे हे निवेदन या कार्यालयातील नायब तहसीलदार डोर्लीकर यांनी स्वीकारले.याप्रसंगी जि. प. सदस्य संजय चरडुके, जारावंडीचे सरपंच सुधाकर टेकाम, शेतकरी संघटना शाखेचे अध्यक्ष हरिदास टेकाम, उपाध्यक्ष केशव पेदापल्लीवार, सचिव लक्ष्मण चन्नेवार आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील जारावंडी, दोलंदा, दिंडवी, भापडा, जांभुळगट्टा, गर्तावाही, मंजीगड, इरपनपायली, मालेनगट्टा, हनपायली, वेडमागड, टेक्का, कसुरवाही, सरखेडा व वडोली भागातील शेतकºयांनी वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती कसने सुरू केले आहे. वनहक्क अधिनियम २००६ नुसार तसेच २००८ नुसार आम्ही प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र आमचे वनदाव्याचे प्रस्ताव प्रलंबितच आहेत. पट्टे न मिळाल्यामुळे शेती उपयोगासाठी शासकीय सवलती घेता येत नाही. या दृष्टीने कार्यवाही करून वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे.