शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कमकुवत वर्गाला न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:54 IST

शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामस्तरावर विधीसेवा सहाय्य चिकित्सालयाची निर्मिती करण्यात येत आहे. येथे कायदेविषयक मोफत सल्ला विधी तज्ज्ञांद्वारे उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देदिवाणी न्यायाधीशांचे प्रतिपादन : कुरखेडा येथे केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : शासन व उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ग्रामस्तरावर विधीसेवा सहाय्य चिकित्सालयाची निर्मिती करण्यात येत आहे. येथे कायदेविषयक मोफत सल्ला विधी तज्ज्ञांद्वारे उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा सामान्य नागरिकांना लाभ व्हावा, तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग आर्थिक कारणाने न्याय हक्कांपासून वंचित राहू नये, या वर्गालाही न्याय द्यावा, असे प्रतिपादन दिवाणी व फौजदारी न्या. एम. आर. बागडे यांनी केले.नगर पंचायत व दिवाणी व फौजदारी न्यायालय कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी कुरखेडा येथे विधी सहाय्य चिकित्सालयाचे शुभारंभ न्या. बागडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना न्या. बागडे बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, मुख्याधिकारी मयूर भुजबळ, बांधकाम सभापती सोनू भट्टड, पाणीपुरवठा सभापती पुंडलिक देशमुख, नगरसेवक बबलू हुसैैनी, रामहरी उगले, शाहेदा मुघल, अर्चना वालदे, नंदिनी दखणे, स्वाती नंदनवार, रूपाली देशमुख, अ‍ॅड. छन्ना जनबंधू, अ‍ॅड. गोकुल नागमोती उपस्थित होते. अ‍ॅड. उमेश वालदे यांनी विधी चिकित्सालयाची संकल्पना सांगितली.संचालन अ‍ॅड. रूपाली माकडे तर आभार नामदेव कोसरे यांनी मानले. विधी चिकित्सालयात विधी तज्ज्ञ म्हणून अ‍ॅड. रूपाली माकडे, सहायक म्हणून अल्का बावनथडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठवड्यातून एक दिवस नागरिकांना येथे मोफत कायदेविषयक सल्ला दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला न्यायालय व नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.