शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अग्निपंख देणार आत्मसमर्पितांना न्याय

By admin | Updated: August 5, 2015 01:29 IST

हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आत्मसमर्पित नक्षलवादी व नक्षल कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोली पोलीस प्रशासन,...

७९ जणांना साहित्य, भूखंड वाटप : पुण्याच्या विविध मंडळांचा पुढाकारगडचिरोली : हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेल्या आत्मसमर्पित नक्षलवादी व नक्षल कुटुंबाना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोली पोलीस प्रशासन, पुणे येथील आदर्श मित्र, रोटरी क्लब कात्रज पुणे, हिंद व श्रीकृष्ण तरूण मंडळ पुणे, लक्ष्मी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूरच्या पुढाकाराने अग्निपंख या नव्या योजनेचा मंगळवारी गडचिरोलीत शुभारंभ करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम, जिल्हाधिकारी रणजितकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे, आदर्श मित्र मंडळ पुण्याचे अध्यक्ष उदय जगताप, पुणे येथील श्रीकृष्ण तरूण मंडळाचे विशाल आव्हाड, हिंद तरूण मंडळाचे दिलीप गिरमकर, स्वामी नृसिंह नागरी सहकारी पतसंस्था बल्लारपूरचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास सूंचूवार आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, यावेळी ३६ लोकांना टीव्ही, २१ जणांना भूखंड व २२ जणांना धनादेश वितरित करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रवींद्र कदम यांनी शासकीय योजनांच्या माध्यमातून अनेक आत्मसमर्पितांना लाभ देण्यात येत आहे, असे प्रतिपादन केले. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्ती आहे. त्यामुळे रोजगारासाठी भटकण्याची गरज नाही. केवळ विचारधारा बदलवून आपण मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, असे आवाहन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी शासन नवीन नवसंजिवनी योजना सुरू केली आहे. या माध्यमातून सर्व सुविधा उपलब्ध आहे. वाट चुकलेल्यांनी मुख्य प्रवाहात दाखल व्हावे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी तर प्रास्ताविक डॉ. राहुल खाडे यांनी केले. यावेळी पोलीस, नक्षलपीडित कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.