शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कसारीला आरोग्य उपकेंद्र द्या

By admin | Updated: September 24, 2016 03:10 IST

तालुक्यातील कसारी येथे स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र्र निर्माण करावे,

पं.स. सभापतींची ग्रामीण विकास मंत्र्यांकडे मागणीदेसाईगंज : तालुक्यातील कसारी येथे स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र्र निर्माण करावे, अशा मागणीचे निवेदन २१ सप्टेंबर रोजी देसाईगंज पंचायत समितीच्या सभापती प्रिती शंभरकर यांनी राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना प्रत्यक्ष भेटून दिले. महाराष्ट्र राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समिती देसाईगंज अंतर्गत कसारी या गावांमध्ये स्वतंत्र ग्राम पंचायत असून या गावाला निर्मल ग्राम पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त पुरस्कार, संत गाडगे बाबा स्वच्छता पुरस्कार या सारखे अनेक विकासात्मक पुरस्कार मिळाले आहेत. या गावाला स्वतंत्र पाणी पुरवठ्याची कोणत्याही प्रकाराची सोय नसून पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न या गावाला नेहमीच भेडसावत आहे. गावकऱ्यांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. तसेच कसारी हे गाव तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट आहे. कसारी पासून १० किमी दूरवर असलेल्या शंकरपूर या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला हे गाव जोडलेला आहे, त्यामूळे या गावातील रूग्णांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कसारी गावाची पाणीपुरवठा समस्या व आरोग्याच्या दृष्टिकोणातून उपकेंद्र देण्याची गरज आहे. ग्राम विकास विभागाने पाणी पुरवठा व प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी प्रिती शंभरकर यांनी पंकजा मुंडे यांच्याकडे केली. नामदार पंकजा मुंडे यांनी कसारी गावाच्या या दोन्ही समस्या लक्ष घालून सोडविल्या जाईल, असे आश्वासन सभापती शंभरकर यांना दिले. (वार्ताहर)