शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अनुभवी जिल्हाधिकारी द्या

By admin | Updated: November 3, 2014 23:26 IST

मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना

नव्या सरकारकडे मागणी : सुरेश पद्मशाली यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनगडचिरोली : मागास व नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी व कार्यक्षम जिल्हाधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. गडचिरोली जिल्हा निर्मितीस ३२ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र गडचिरोली शहर, वडसा शहर, तालुक्याचे ठिकाण तसेच विविध मोठ्या गावांचा विकास झाला नाही. गडचिरोली हा राज्याच्या क्रमवारी शेवटच्या क्रमांकाचा जिल्हा असल्याने महाराष्ट्र शासनाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकारीपदी अनुभव नसलेल्या नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नव्या अधिकाऱ्यांना अनुभव घेताघेता त्यांची बदली करण्यात येते. त्यामुळे नवे अधिकारी जिल्ह्याचा गतीने विकास करू शकत नाही. गडचिरोली जिल्ह्याबरोबर निर्माण झालेला लातूर जिल्हा व त्यानंतर निर्माण झालेले अनेक जिल्हे प्रगतिपथावर आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा अद्यापही आहे त्याच स्थितीत आहे. जिल्हा निर्माण झाल्यानंतर गडचिरोली नगर परिषदेची (ग्रामपंचायतीची) स्वतंत्र इमारत होती. सद्यस्थितीत नगर परिषदेचे प्रशासकीय कामकाज खासदार निधीतून बांधलेल्या आदिवासी सांस्कृतीक भवनात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्याचे प्रथम जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी बांधलेली मुख्य मार्गावरील राजस्व भवनाची शासकीय इमारत दारूच्या रिकाम्या बॉटला ठेवण्यासाठी वापरली जात आहे. गडचिरोली शहरात एकमेव असलेल्या इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफीक सिग्नल दोन ते तीन वर्षापासून बंद आहे. एमआयडीसी व जिल्हा कारागृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. गडचिरोली शहरात नागरिकांच्या सोयीसाठी एकही बगीचा नाही. ५०० ते १००० नागरिक एकत्र बसू शकतील, असे नगर भवन अथवा सांस्कृतीक भवनाची सोय नाही. गडचिरोली शहरात जिल्हाधिकारी स्वत: निवासी राहतात. मात्र ते गडचिरोली शहराच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत. तर जिल्ह्याच्या १२ तालुक्यांकडे व १६०० गावांकडे किती लक्ष देतात, याची कल्पना येते. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणा गतीमान असायला हवी. मात्र कार्यरत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्याचा विकास रखडला आहे, असा आरोपही सुरेश पद्मशाली यांनी केला आहे. जिल्ह्याच्या जलद विकासासाठी अनुभवी जिल्हाधिकाऱ्याची गरज असल्यामुळे अनुभवी जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पद्मशाली यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)