शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:49 IST

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना निवेदन : जमिनीला चारपट भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन जात आहे, अशा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी कुणबी समाज संघटनेने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या अगदी समांतर बांधले जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती जाणार आहे. काही शेतकरी कायमचे भूमीहिन होणार आहेत. रेल्वेचा फायदा शहरांना होणार असला तरी शेतकरी मात्र नेस्तनाभूत होणार आहेत. शेतकऱ्यांना नगण्य किंमत देऊन त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. रेल्वेमध्ये जमीन गेल्यानंतर दुसरीकडे बाजार भावाप्रमाणे जमीन खरेदी करता यावी, यासाठी त्यांना योग्य मोबदला देणे आवश्यक आहे. खुल्या बाजाराच्या चारपट रक्कम द्यावी, शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एकाला रेल्वे बोर्डाच्या सेवेत सामावून घ्यावे, भूमीहिन होणाºया शेतकºयांना त्याच परिसरात शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज शहरातील भूखंडधारकांना बाजारभावाप्रमाणे दर द्यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदन देतेवेळी आशिष ब्राह्मणवाडे, भूपेश फुलझेले, वसंत राऊत, भगवान घोटेकर, प्रा. सचिन फुलझेले, प्रशांत ठाकरे, सुनील बाबनवाडे, प्रा. पंकज नरूले, स्वप्नील मलोडे, सचिन गोंगल, आशिष म्हशाखेत्री, रा.ना. गोहणे, विलास भोयर, अभय मुलताने, व्ही.आर. चुधरी, रत्नदीप म्हशाखेत्री, रूपेश ठाकरे, संदीप ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, नगरसेवक सतीश विधाते, विलास खेवले, महाजन आदी उपस्थित होते.