शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जीआयएस सर्वेची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:17 IST

मालमत्ता कराचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी गडचिरोली शहरात एका खासगी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जीआयएस (ग्लोबल इन्फारमेशन सिस्टिम) सर्वे केला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून सर्वे सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत सर्वेचे काम पूर्ण झाले नाही.

ठळक मुद्देअपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम : सहा महिने उलटूनही काम अपूर्णच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मालमत्ता कराचे पुनर्मुल्यांकन करण्यासाठी गडचिरोली शहरात एका खासगी स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जीआयएस (ग्लोबल इन्फारमेशन सिस्टिम) सर्वे केला जात आहे. मागील सहा महिन्यांपासून सर्वे सुरू आहे. मात्र अजूनपर्यंत सर्वेचे काम पूर्ण झाले नाही.नगर परिषदेच्या हद्दित येणाºया मालमत्तेवर नगर परिषदेच्या वतीने कर आकारला जातो. यामध्ये प्रामुख्याने इमारतीचा समावेश होतो. दर चार वर्षाने पुनर्मुल्यांकनाचे काम केले जाते. यासाठी सर्वे करावा लागतो. शासनाच्या निर्देशानुसार जीआयएस सर्वे केला जात आहे. सर्वे करण्याचे काम एका खासगी स्वयंसेवी संस्थेला देण्यात आले आहे. संस्थेने नेमलेले प्रतिनिधी प्रत्यक्ष घरी जाऊन घराचे मापण करीत आहेत. सदर काम सहा महिन्यांचा कालावधी आटोपला तरी अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. सर्वेक्षणाला सुरूवात झाली. त्यावेळी २० कर्मचाºयांच्या मार्फत सर्वे केला जात होता. आता मात्र केवळ सहा कर्मचारी शिल्लक आहेत. मनुष्यबळ कमी झाल्याने कामाची गती मंदावली आहे. परिणामी सर्वेचे काम पूर्ण करण्यास विलंब होत आहे. अजुनही काही वार्डांमधील घरांचे सर्वेक्षण झाले नाही. सर्वेक्षणाची प्रक्रिया तत्काळ आटोपावी, अशी मागणी आहे.नागरिकांच्या विरोधामुळे विलंबराज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक घरातील खोलीचे मोजमाप घ्यायचे आहेत. त्यानुसार सर्वे करणारे कर्मचारी घरात शिरून लेजर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घराची लांबी, रूंदी तसेच खोलीची लांबी रूंदी मापत आहेत. मात्र काही नागरिकांनी याला विरोध केला आहे. हे चुकीचे असून राज्य शासनाच्या निर्देशानुसारच काम केले जात आहे, अशी माहिती नगर परिषदेच्या अधिकाºयांनी दिली आहे. एकही घर सर्वेपासून वंचित राहू नये, असे राज्य शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरी दोन ते तीन वेळा जाऊन त्यांना सर्वे करण्याबाबत विनवणी केली जात आहे. यामुळेही सर्वेक्षणास विलंब होत आहे.दीड वर्षांपासून नवीन घर टॅक्सची आकारणी रखडलीजीआयएस सर्वे करण्याच्या पूर्वी एक वर्षाअगोदरपासूनच नवीन घरांचा टॅक्स लावण्याचे काम बंद करण्यात आले. एकंदरीत दीड वर्षांपासून नवीन घर टॅक्स आकारणी बंद पडली आहे. काही नागरिकांना घर टॅक्स पावतीची गरज भासते. घर असूनही पावती नसल्याने प्रशासकीय कामे रखडली आहेत. त्यामुळे जीआयएस सर्वे पूर्ण करावा, अशी मागणी आहे.अनेक घरे घरटॅक्सविनागडचिरोली शहरात एकूण ११ हजार घरे असावी, असा अंदाज नगर परिषदेने बांधला. त्यानुसार उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात सर्वे करणाऱ्यांना १२ हजार १८१ घरे आढळून आली आहेत. अजुनही सर्वेचे काम सुरूच आहे. त्यामुळे आणखी घरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यावरून सदर घरे आजपर्यंत घरटॅक्सविनाच होती. आता या घरांवर सुरूवातीपासूनच कर आकारला जाणार आहे.