शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

राखीच्याआधीच लाडक्या बहिणींना 'ओवाळणी' ! दोन महिन्यांचे ३ हजार जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 15:48 IST

मोबाइलवर आले मेसेज : जिल्ह्यात १.५३ लाख लाभार्थी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याच्या नक्षल प्रभावित व दुर्गम भागात सोयी-सुविधा नसतानाही 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत १ लाख ५६ हजार ३५७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ५३ हजार ५०२ अर्ज राज्यस्तरावर पडताळणी करून पाठविण्यात आलेले आहेत. या अर्जाची राज्यस्तरावर निधी वितरणाकरिता पडताळणी करण्यात आली; परंतु सुमारे २० हजार महिलांचे खाते हे आधार क्रमांकाशी संलग्न नसल्याचे (ई-केवायसी) नसल्याचे आढळून आले आहे. तरीसुद्धा बुधवार, १४ ऑगस्टपासून महिलांच्या बँक खात्यावर दोन महिन्यांचे ३ हजार रुपये वितरणास सुरूवात झालेली आहे.

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपये याप्रमाणे निधी वितरीत केला जाणार आहे. याची कार्यवाही १४ ऑगस्टपासून केली जाणार असली तरी १७ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुणे जिल्ह्याच्या बालेवाडी येथील कार्यक्रमातून पात्र महिलांना निधी वितरीत केला जाणार आहे. ज्या महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न नाही, अशा महिलांनी बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे किंवा ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे

महिलांनो, ई-केवायसी केली आहे का?ज्या महिलांची ई-केवायसी झालेली नाही. त्यांनी स्वतःचे मूळ आधार कार्ड, बँक पासबुक, जन्मतारखेचा पुरावा व स्वतःचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा मोबाइल घेऊन आपले खाते असलेल्या बँक शाखेत, सीएससी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, बँक व्यावसायिक मित्र किंवा बँक सुविधा केंद्रात तातडीने जावे. बँक खात्याशी आधार संलग्न करावे, असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.

तर जमा होणार नाही लाभजिल्ह्यातील ज्या महिलांचे खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल त्यांचे खात्यात रक्कम वितरीत करताना अडचण येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र महिलांचे खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नाही, अशा महिलांच्या बँक खात्यावर ३ हजार रुपये रक्कम जमा होणार नाही.

मोबाइल अॅप बंद, पोर्टलवर अडचणी'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे अर्ज सुरूवातीला 'नारीशक्ती' मोबाइल अॅपवरून भरले जात होते. ऑगस्ट महिन्यापूर्वी हे अॅप बंद करण्यात आले. त्यानंतर पोर्टल सुरू करण्यात आले. पोर्टलवर काही दिवस अर्ज सबमिट होत नव्हते. आतासुद्धा अनेकांना सदर पोर्टलवर अर्ज करण्यासाठी अडचणी येत आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात तर पोर्टल सुरळीत चालण्यासाठी नेटवर्क समस्या निर्माण होत आहे.

"'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे निधी वितरीत करण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांना लाभ मिळावा यासाठी त्यांचे बँक खाते हे आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. तरी ज्या लाभार्थीचे खाते आधार कार्ड संलग्न नसेल किवा खातेदारांनी ई-केवायसी केली नसेल त्यांच्या खात्यावर या योजनेचा जमा होण्यासाठी संबधित महिलांनी आपले खाते ई-केवायसी केल्याची निधी पडताळणी करावी. सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे."- आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाGadchiroliगडचिरोली