शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन असूनही पाणी मिळेना

By admin | Updated: June 2, 2016 02:56 IST

गावाच्या हद्दीत जलकुंभ उभारण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकले नाही.

राजपूर पॅचवासीय त्रस्त : पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्षअहेरी : गावाच्या हद्दीत जलकुंभ उभारण्यात आले. पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र, प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्यापही गावातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळू शकले नाही. अहेरी तालुक्यातील राजपूर पॅच ग्रामपंचायतीमध्ये हे वास्तव आहे.अहेरी तालुक्यातील बोरी व राजपूर पॅच या ग्रामपंचायती समोरासमोर आहेत. आष्टी-आलापल्ली मार्गाने या ग्रामपंचायतींची विभागणी झालेली आहे. या मार्गाच्या एका बाजुला बोरी तर दुसऱ्या बाजूला राजपूर पॅच ग्रामपंचायतीची हद्द आहे. काही दिवसांपूर्वी राजपूर पॅच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बोरी ग्रा. पं. च्या नावाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून लाखो रूपये खर्च करून जलकुंभ उभारण्यात आले. त्यानंतर अनेक वर्ष ही योजना शोभेची वास्तू म्हणून उभी होती. सन २०१२-१३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून बोरी व राजपूर पॅच ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकण्यात आली. मात्र या योजनेतून राजपूर पॅचसाठी पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे पाईपलाईन टाकूनही पाणी मिळेना, अशी स्थिती राजपूर पॅचमध्ये निर्माण झाली आहे. वास्तविक राजपूर पॅच ग्रामपंचायतीच्या हद्दीत बोरी ग्रामपंचपयतीच्या नावाने जलकुंभ उभारण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गावात पाईपलाईन टाकूनही पाणी मिळत नसल्याने राजपूर पॅचवासीयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत राजपूर पॅच येथील ग्रामसभेत बोरी नळयोजनेत राजपूर पॅचचा समावेश करावा, असा ठराव घेऊन तो बोरी गामपंचायतीला पाठविण्यात आला. मात्र महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून ग्रामपंचायतीला योजना हस्तांतरित झालेली नाही. योजना हस्तांतरित झाल्यानंतर पाहू, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गावाच्या हद्दीत नळयोजना असूनही नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने बोरीच्या योजनेतून राजपूर पॅचचा समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)