शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनविरोधी अभियानाचे मुक्तीसैनिक व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:39 IST

२०१८ हे वर्ष अस्ताला जाऊन २०१९ चा सूर्योदय सर्वांची वाट पाहत आहे. नवी सुरुवात ही आनंदात आणि भान राखून होणे गरजेचे आहे. पण देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला बेभान करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे.

ठळक मुद्देअभय बंग यांचे आवाहन : साकारली व्यसनविरोधी मानवी साखळी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१८ हे वर्ष अस्ताला जाऊन २०१९ चा सूर्योदय सर्वांची वाट पाहत आहे. नवी सुरुवात ही आनंदात आणि भान राखून होणे गरजेचे आहे. पण देशाचे भविष्य ज्यांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला बेभान करून नव्या वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे. अशी स्थिती सर्वत्र असताना गडचिरोलीची तरुणाई व्यसन विरोधी अभियानात सहभागी होत असल्याची बाब अभिनंदनीय आहे. ही युवा पिढी अशीच व्यसनमुक्त राहण्यासाठी दारूच्या पहिल्या घोटापासूनच त्यांनी दूर राहणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यसन विरोधी अभियानाचे मुक्तीसैनिक होऊन व्यसनमुक्तीच्या लोकलढ्यात सहभागी व्हा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर केले.नव्या वर्षाचे स्वागत सर्वांनी आनंदी आणि शुद्धीत राहून करावे, सोबतच युवा वर्गाने व्यसनमुक्त राहण्याचा निर्धार करावा यासाठी मुक्तिपथ अभियान आणि राष्ट्रीय सेवा योजना, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने युवा वर्गाच्या सहभागातून ३१ डिसेंबर रोजी शहरात व्यसनविरोधी मानवी साखळी तयार करून व्यसनमुक्तीची हाक देण्यात आली. या अभियानात सहभागी होत डॉ. बंग यांनी युवकांशी संवाद साधला. यावेळी विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर उपस्थित होते. थोडीशी गम्मत म्हणून सुरु झालेली दारूची मजा संपूर्ण शरीराचा ताबा घेते. त्यामुळे हिंसा, अत्याचार, अपघात या प्रकारांच्या मुळाशी दारूचे व्यसन असते. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात या वर्षात दारूमुळे ३०० वर अपघात झाले आहे. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी सर्वांनी व्यसनमुक्त होण्याची गरज त्यांनी व्यक्त करतानाच या मानवी साखळीतून हा संकल्प युवा वगार्तून प्रगट झाल्याचे डॉ. बंग यावेळी म्हणाले.दारू पिऊन होत असलेले अपघात आणि त्या अपघाताचा कुटुंबावर पडणारा प्रभाव दाखविणारे पथनाट्य शासकीय विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे सादर केले. सर्वांनी हातात हात घेऊन व्यसनविरोधी मानवी साखळी यावेळी तयार केली. शिवाजी महाविद्यालय, इंदिरा गांधी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, फुले, शाहू, आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, आयटीआय, कृषी महाविद्यालय, शासकीय विज्ञान महाविद्यालयातील आणि एकूण २१६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.चौकात लागला आरसाशहरात दारूविक्री होणाऱ्या जागा, त्यांची संख्या, या महिन्यात झालेली कृती आणि या कृतीमुळे बंद झालेली दारू हे दर्शविणारा ‘गडचिरोली शहराचा आरसा’ असलेला फलक शहराच्या मध्यभागी गांधी चौकात यावेळी लावण्यात आला. डॉ. अभय बंग यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले. किती जागी पोलिसांनी कारवाई केली हे प्रत्येक महिन्यात या आरशावर लिहिले जाणार आहे.