शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:36 IST

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या ...

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले.

जिल्ह्यातील १० तालुक्यांसाठी मंजूर केलेले १० ऑक्सिजन जनरेशन प्लांट तातडीने पूर्ण करण्याची सूचना शिंदे यांनी प्रशासनाला केली. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांशी दिवसातून २ वेळा तरी संपर्क साधण्यास त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोनास्थितीविषयी पालकमंत्र्यांना माहिती दिली.

या ऑनलाइन बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.

(बॉक्स)

लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. त्यासोबतच सध्या राज्यात वेगाने वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगासाठी लागणारी सारी सज्जता करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या रोगात रुग्णांचा मृत्युदर जास्त असल्याने जिल्ह्यात याचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्यास त्यांनी सांगितले. या रोगाची औषधे महाग असल्याने त्यांचा पुरेसा साठा आधीच करून ठेवावा, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पाचशे इंजेक्शन्सची ऑर्डर दिल्याची माहिती दिली.

(बॉक्स)

लसीकरणासाठी व्यापक जनजागृतीची गरज

जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती जाणून घेताना या भागातील आदिवासी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेऊन आदिवासींच्या मनातील ही भीती दूर करण्याचे प्रयत्न करा, असे पालकमंत्री म्हणाले.

(बॉक्स)

मान्सून परिस्थितीचा आढावा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने मान्सूनच्या परिस्थितीचा आढावादेखील यावेळी पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्यातील नागरिकांना ३ महिन्यांच्या रेशनचा पुरवठा करणे, सर्पदंश आणि विंचुदंश यावरील औषधांचा सर्व तालुक्यातील आरोग्य केंद्रात साठा करून ठेवणे, जिल्ह्यातील गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवणे अशी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळीच पूर्ण करावीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावा लागणारा औषधांचा पुरवठा येत्या १५ दिवसांत करून ठेवावा, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत प्रशासनाला केल्या.