शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

विकासासाठी संघटित व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 22:04 IST

कुणबी समाज हा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात विखुरलेला आहे. मात्र सदर समाजाची अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झाली नाही. समाजाचा विकास करण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय तरणोपाय नाही.

ठळक मुद्देविद्या आभारे यांचे आवाहन : चामोर्शीत कुणबी समाजाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कुणबी समाज हा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात विखुरलेला आहे. मात्र सदर समाजाची अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झाली नाही. समाजाचा विकास करण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय तरणोपाय नाही. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील कुणबी समाज बांधवांनी संघटीत व्हावे, असे आवाहन जि.प. सदस्य विद्या हिंमत आभारे यांनी केले.चामोर्शी शहर कुणबी समाज संघटनेच्या वतीने रविवारी येथील शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात कायदेविषयक शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम तथा समाज मेळावा घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक लोढे होते. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. माधुरी रोहणकर, श्रीकांत कुत्तरमारे, डॉ. देवेंद्र मुनघाटे, प्राचार्य डॉ. वंदना चौथाले, डॉ. गोविंदराव टिचकुले, खुशाल चुधरी, रमेश काकडे, संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळू दहेलकर, धोंडबाजी मोरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.कुणबी समाज विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी आपआपासातील मतभेद दूर सारणे गरजेचे आहे. समाजात जनजागृती करून समाजाची चळवळ बळकट करण्याची ही वेळ आहे. यासाठी प्रत्येक समाज बांधवाने सहकार्य करावे, असेही विद्या आभारे यावेळी म्हणाल्या.याप्रसंगी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक खुशाल चुधरी, लिपीक रमेश काकडे यांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. माधुरी रोहणकर, श्रीकांत कुत्तरमारे, डॉ. देवेंद्र मुनघाटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल येलमुले, अविनाश चौधरी, दिनेश चुधरी, झाडे, सदाशिव वाघरे, हिंमतराव आभारे, गोकुळ झाडे, कुडे, भानूदास किनेकार, संजय खेडेकर, ज्ञानेश्वर गोहणे, धनराज पोरटे, कोकेश्वर लडके, विनायक रोहणकर, दिवसे, नामदेव किनेकार, नागेश भोयर, देवाजी काकरे, यादव पाल आदींनी सहकार्य केले. प्रास्ताविक पुरूषोत्तम घ्यार, संचालन भोयर यांनी केले तर आभार पोरटे यांनी मानले. कार्यक्रमाला चामोर्शी शहरासह लगतच्या गावातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने हजर होते.