राष्ट्रीय मार्गावर ग्रामीण रुग्णालय, बँक, शाळा, महाविद्यालय असल्याने या मार्गावर नागरिकांची खूप रेलचेल असते. अर्धवट काम झालेल्या या रस्त्यावर अपघाताची दाट शक्यता आहे. तसेच या मार्गावरून वाहनांचा वेगही खूप असल्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी या रस्त्यावर अपघातास आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना व मार्गावरील व्यावसायिकांना तसेच रहिवासी नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. असे असले तरी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आष्टी येथील नागरिकांच्या समस्येची दखल घेत सदर मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख राकेश बेलसेरे, अरुण चौधरी, प्रकाश बोबाटे, रवी आलचेट्टीवार उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:33 IST