शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:58 IST

आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देआमदारांचे कंत्राटदार व यंत्रणेला निर्देश : वैैलोचना नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी तालुक्यातील वैरागड- मानापूर मार्गावरील वैैलोचना नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आ. कृष्णा गजबे यांनी नुकतीच केली. सदर पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून हा पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देश त्यांनी संबंधित कंत्राटदार व यंत्रणेला यावेळी दिले.वैरागड-मानापूर मार्गावर बारमाही वाहणारी वैलोचना नदी आहे. सदर मार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक गावांची लोकवस्ती असल्याने या गावातील नागरिक थेट मार्ग म्हणून याच रस्त्याचा उपयोग करतात. परिणामी या मार्गावर दररोज दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या नदीला पाणी कमी राहत असल्याने जुन्या कमी उंचीच्या पुलावरून वाहतूक सुरळीत चालते. मात्र पावसाळ्यात पर्जन्यमानामुळे वैलोचना नदी दुथळी भरून वाहत असते. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसाने वैलोचना नदीच्या जुन्या पुलावर तीन ते चारदा पाणी चढले होते. परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. कमी उंचीच्या पुलामुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून या ठिकाणी नवीन उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले. व हे काम गेल्या वर्षाभरापासून सुरू आहे. पाहणीदरम्यान आ. गजबे यांनी सदर पुलाच्या कामात योग्य दर्जा राखण्यात यावा, असेही निर्देश कंत्राटदार व यंत्रणेला दिले. त्यानंतर या परिसरातील धान पीक नुकसानीची पाहणी त्यांनी केली. याप्रसंगी जि. प. सदस्य संपत आळे, नंदू पेट्टेवार, भाष्कर बोडणे, महेंद्र ताविळे, तंमुस अध्यक्ष सावरकर, उपसरपंच अहीरकर, राजू आकरे आदी उपस्थित होते.वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदीवर पुलाचे बांधकाम अतिशय गतीने सुरू आहे. त्यामुळे या पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. आगामी पावसाळ्यात नव्या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची चिन्ह आहेत.