शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धान पिकाच्या किडीवर नियंत्रण मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:09 IST

पावसाची दांडी व वातावरणातील बदलामुळे धान पिकावर लष्कर, पाने गुंडाळणारी अळी तसेच बेरडी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनी किडी व रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे तसेच किटकशास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.

ठळक मुद्देकीटकशास्त्रज्ञांचे आवाहन : शेतकऱ्यांनी जपून फवारणी करावी, पावसाने दडी मारल्यामुळे पिकांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पावसाची दांडी व वातावरणातील बदलामुळे धान पिकावर लष्कर, पाने गुंडाळणारी अळी तसेच बेरडी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकºयांनी किडी व रोगांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कºहाळे तसेच किटकशास्त्रज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला बºयापैकी सुरवात झाली असून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये रोवणीची कामे आटोपलेली आहेत. सध्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारली असून ढगाळ वातावरण कायम आहे. नियमित ढगाळ वातावरण, रिमझीम पाऊस, वातावरणातील भक्कम आर्द्रता व दिवसातील ३-४ तास सूर्यप्रकाश हा लष्करी अळीचा उद्रेक होण्यास पोषक वातावरण ठरू शकतो व त्यामुळेच लष्करी अळीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गादमाशी : गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधूनच सुरू होतो. उशीरा रोवणी केलेले धान, ढगाळलेले वातावरण, रिमझीम पडणारा पाऊस, ८० ते ९० टक्के वातावरणातील आर्द्रता या किडीच्या वाढीस अतिशय पोषक ठरते. प्रादुर्भावग्रस्त फुटवे आढळून आल्यास फोरेट १० टक्के दाणेदार १० किलो किंवा क्विनॉलफॉस ५ टक्के दाणेदार १५ किलो प्रती हेक्टरी या प्रमाणाात बांधीमध्ये ५ ते १० सेंमी पाणी असताना नियंत्रणाकरीता वापरावे.पाने गुंडाळणारी अळी : या किडीचे पतंग सोनेरी फिक्कट सोनेरी पिवळसर रंगाचे असतात. त्यांच्या पंखावर काळी नागमोळी नक्षी असते. पूर्ण वाढलेली अळी पिवळसर हिरवट असते, डोके मात्र काळसर असते. अळी नेहमी पानाच्या गुंडाळीत राहते. किडग्रस्त पाने दिसल्यास मॅलाथीआॅन ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा टॉयझोफॉस ४० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सुरळीतील अळी /बेरडी : पतंग लहान व नाजूक असून त्याचे पांढºया पंखावर तांबूस लालसर ठिपके असतात. अळी पानाच्या सुरळीत किंवा पुंगळीत असते. पाने कैचीने कापल्यासारखे दिसल्यास किटकनाशकाची फवारणी करावी, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.असा करा लष्करी अळीचा नायनाटलष्कर अळ्या पाने कुरतडतात. या अळीच्या नियंत्रणाकरीता क्लोरोपायरीफॉस २० ई.सी. ४ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही २८ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर ही अळी नष्ट होते.