शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्ता संकलनाने ग्रामसभा मालामाल

By admin | Updated: May 27, 2014 23:41 IST

गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजाविणार्‍या ग्रामसभांना बहुतांश गावचे नागरिक उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा तहकूब कराव्या लागतात. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असताना आरमोरी तालुक्यातील

प्रदीप बोडणे - वैरागड

गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजाविणार्‍या ग्रामसभांना बहुतांश गावचे नागरिक उपस्थित राहत नसल्याने ग्रामसभा तहकूब कराव्या लागतात. ही परिस्थिती संपूर्ण राज्यात असताना आरमोरी तालुक्यातील १२ ग्रामपंचायती मात्र याला अपवाद ठरल्या असून तेंदूपत्ता संकलनाचे योग्य नियोजन करून या ग्रामसभांनी ४५ लाख रूपयाचे तेंदूपत्ता संकलन केले आहे. यातून गावातील हजारो नागरिकांना रोजगार प्राप्त झाला आहे.

गावाचा विकास गावातील नागरिकांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर गावाच्या विकासाची प्रत्येक योजना राबविताना गावकर्‍यांचा सहभाग राहील, अशा पध्दतीने योजनांचे नियोजन केले जात आहे. वनहक्क कायद्यांन्वये गावाच्या हद्दीतील वनोपज गोळा करण्याचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. या अंतर्गत आरमोरी तालुक्यातील कुकडी, नरोटी, नरोटी माल, मेंढा, डोंगरतमाशी, शिश्री, गणेशपूर, कुरंडी (चक), टेंभा (चक), मौशिखांब, मरेगाव, चांभार्डा या १२ गावांनी तेंदूपत्ता संकलन स्वत: करण्याचा निर्णय घेतला. संकलन केलेला तेंदूपत्ता महामंडळाला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. मजुरांना वनविभागाच्या नियमानुसार मजुरी देण्यात यावी, ही अट महामंडळाने घातली. त्यानुसार सर्वच ग्रामसभांनी या अटीचे पालन करीत मजुरांना किमान मजुरी देण्याचे मान्य केले. १२ गावांच्या सभोवताल घनदाट जंगल असून या जंगलात उच्च दर्जाचा तेंदूपत्ता आहे. हजारो मजुरांच्या सहाय्याने तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. १२ ग्रामसभांनी एकूण ४५ लाख रूपयाचे तेंदूपत्ता संकलन केले आहे. यासाठी ग्रामसभांचे प्रमुख गिरीधर कुमरे, रघुनाथ कुमोटी, दिलीप नवघडे, पुरूषोत्तम किरंगे, यादव कुमरे, मनोहर शेंद्रे, रविंद्र कुमरे, पुरूषोत्तम पदा, ऋषी किरंगे, एकनाथ पदा, घनशाम मडावी, रविंद्र किरंगे, पल्लवी कुमरे व गावकर्‍यांनी सहकार्य केले आहे. तेंदूपत्ता संकलनाने आपला विकास आपणच करू शकतो असा विश्‍वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.