रांगी : धानोरा तालुक्यातील रांगी येथील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक १५ फेब्रुवारीला पार पडली. ही निवड बिनविराेध करण्यात आली. सरपंचपदी फालेश्वरी गेडाम तर उपसरपंचपदी नूरज हलामी यांची बिनविरोध निवड झाली. ९ सदस्यीय ग्रा.पं.मध्ये सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होते. त्यात सरपंच पदाकरिता फालेश्वरी प्रदीप गेडाम तर उपसरपंच पदाकरिता नूरज गेडाम यांचे एकमेव उमेदवारी अर्ज आले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी ९ पैकी ७ सदस्य उपस्थित होते. सभेला आवश्यक असलेली एक तृतीयांश गणपूर्ती पूर्ण झाल्यामुळे निवडणूक सभा दुपारी २ वाजता सुरू झाली. सभेला ग्रामपंचायत सदस्य शशिकांत साळवे, अर्चना मेश्राम, शशिकला मडावी, नूरज हलामी, फालेश्वरी गेडाम, विद्या कपाट, वच्छला हलामी उपस्थित होते. अध्याशी अधिकारी म्हणून डी.एम. वाकुलकर यांनी काम पाहिले. सभेला तलाठी शशिकला खोब्रागडे, सचिव वासुदेव बुराडे उपस्थित होते. निवडीबद्दल आविका संस्थेचे व्यवस्थापक सुरेश हलामी, माजी सरपंच जगदीश कन्नाके, विलास पदा, प्रदीप गेडाम, श्रावण देशपांडे, दिवाकर भोयर, नितिन कावळे, नामदेव बैस, गंगाधर पुराडे, मनोज मिसेकार, रवींद्र रोहनकार यांनी आनंद व्यक्त केला.
रांगीच्या सरपंचपदी गेडाम तर उपसरपंचपदी हलामी अविराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:43 IST