शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन व्यवहारानंतरही गॅस ग्राहकांची लूट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:05 IST

गॅस वितरणाच्या व्यवहारांमध्ये गतिमानता व पारदर्शकता आणण्याासठी गॅस कंपन्या सिलिंडर रिफिलिंगची प्रक्रिया आॅनलाईन करीत आहेत. यासाठी एचपी गॅस एजन्सीने स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. गॅस रिफिलिंगचे पैसे संबधित ग्राहकांच्या खात्यामधून कपात होतात. यामध्ये गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचवून देण्याचा खर्च समाविष्ट राहतो.

ठळक मुद्दे४० ते ५० रुपयांची मागणी : ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या, संबंधितांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गॅस वितरणाच्या व्यवहारांमध्ये गतिमानता व पारदर्शकता आणण्याासठी गॅस कंपन्या सिलिंडर रिफिलिंगची प्रक्रिया आॅनलाईन करीत आहेत. यासाठी एचपी गॅस एजन्सीने स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. गॅस रिफिलिंगचे पैसे संबधित ग्राहकांच्या खात्यामधून कपात होतात. यामध्ये गॅस सिलिंडर घरापर्यंत पोहोचवून देण्याचा खर्च समाविष्ट राहतो. तरीही गॅस सिलिंडर आणणारे मजूर ग्राहकांकडून ३० ते ४० रुपये उकळत आहेत.गॅस सिलिंडर रिफिलिंगची आॅनलाईन प्रक्रिया होण्यापूर्वी ग्राहकाला सिलिंडरचे पैसे सिलिंडर आणणाऱ्या मजुराला द्यावे लागत होते. दरदिवशी गॅस सिलिंडरचे दर बदलत राहतात. याचा गैरफायदा मजुरांकडून घेऊन अधिकचे पैसे उकळले जात होते.यावर उपाय म्हणून एचपी गॅस एजन्सीने स्वतंत्र अ‍ॅप तयार केला आहे. या अ‍ॅपमध्ये गॅस रिफिलिंगची नोंदणी करण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध आहे. या अ‍ॅपसोबत बँक खातेही लिंक असल्याने गॅस रिफिलिंगसाठी नोंदणी झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या खात्यातून तेवढे पैसे कपात होतात. यामध्ये ग्राहकाच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचवून देण्याचा खर्च समाविष्ट आहे. त्यामुळे सिलिंडर घरी घेऊन येणाऱ्या मजुराला एकही रुपया देण्याची गरज नाही. मात्र काही मजूर नागरिकांकडून १० ते २० रुपये मागतात. यापूर्वी मागितलेले पैसे व चिल्लर नसल्याचे सांगून उर्वरित पैसे परत न केल्याने प्रत्येक सिलिंडरमागे संबंधित मजूर ४० ते ५० रुपये कमवत होते. आता मात्र चिल्लर नसल्याचे कारणच राहले नाही. त्यामुळे मजुरांच्या वरकमाईला मर्यादा यायला लागल्या आहेत. त्यामुळे मजूर ग्राहकांकडून थेट ४० ते ५० रुपये मागत आहेत. बºयाच वेळा ग्राहकाचे घर दूर असल्याचे कारण सांगितले जाते.सिलिंडर परत नेण्याची धमकीज्यावेळी गॅस सिलिंडर घरी आणला जातो, त्यावेळी घरातील मुख्य व्यक्ती अनेक वेळा बाहेर राहतात. महिलांकडे बहुदा अधिकचे पैसे राहात नाही. अशावेळी पैसे न दिल्यास गॅस सिलिंडर परत नेण्याचीही धमकी मजूर देतात. या सर्व प्रकारांमध्ये गॅस एजन्सीच्या मालकाचा दोष नसला तरी गडचिरोली शहरातील सर्वात मोठी गॅस एजन्सी म्हणून ओळख निर्माण केलेल्या एजन्सीची बदनामी होत आहे. या प्रकाराकडे एजन्सीच्या संचालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पैसे मागण्याचे प्रमाण वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.