ऑनलाईन लोकमतकुरखेडा : शहरातील केतन उपहार गृहात गॅस शेगडीचा पाईप लिक झाल्याने आगीचा भडका उडाला. मात्र नागरिकांनी जोखमी पत्करत रेती, पाणी व इतर साहित्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. सदर घटना शनिवारी दुपारी ५ वाजता घडली.केतन उपहार गृह बाजारपेठेच्या मध्यभागी आहे. शनिवारी कुरखेडा येथील आठवडी बाजार असल्याने दुकानात मोठी गर्दी झाली होती. दुकानाला लागूनच असलेल्या किचनमध्ये गॅस शेगडीचा पाईप लिक झाला. त्यामुळे आगीचा भडका उडाला व पळापळ सुरू झाली. दुकानासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली. गॅसजवळच्या हंड्याजवळ आग भडकत असताना जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. तरीही काही नागरिकांनी हिंमत दाखवत रेती व पाण्याच्या मदतीने आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न केला. काही वेळानंतर आग आटोक्यात आली. बाजारपेठ परिसरात मोठी गर्दी होती. त्याचबरोबर या परिसरात अनेक दुकाने आहेत. आगीने रौद्ररूप धारण केले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. दिवसेंदिवस कुरखेडा शहर व ग्रामीण भागाची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे कुरखेडा येथे अग्नीशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
उपहारगृहात गॅसचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:54 IST
शहरातील केतन उपहार गृहात गॅस शेगडीचा पाईप लिक झाल्याने आगीचा भडका उडाला. मात्र नागरिकांनी जोखमी पत्करत रेती, पाणी व इतर साहित्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
उपहारगृहात गॅसचा भडका
ठळक मुद्देकुरखेडातील घटना : मोठी दुर्घटना टळली