गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या मार्फतीने स्मशानभूमी परिसरात बगिचाची निर्मिती केली जाणार असून सद्य:स्थितीत अंत्यविधी व सभा मंडपाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलाजवळ नगर परिषदेची जवळपास सात एकर जागा आहे. यातील दोन ते तीन एकर जागा नवीन पुलाकडे जाणाऱ्या मार्ग निर्मितीसाठी वापरली जाणार आहे. उर्वरित जागेवर बगिचाची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी नगर परिषदेला ८० लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सद्य:स्थितीत प्रेत जाळण्यासाठी त्याचबरोबर शोकसभा व सभामंडपासाठी स्वतंत्र इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. (नगर प्रतिनिधी)
स्मशानभूमीवर होणार बगिचाची निर्मिती
By admin | Updated: March 16, 2015 01:17 IST