शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुगार खेळण्यासाठी तेलंगणातून दाखल हाेतात शाैकिनांचे जथ्थे; पातागुड्डम रस्त्यावर रंगताे खुलेआम डाव

By दिगांबर जवादे | Updated: August 10, 2023 20:04 IST

सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाणे हद्दीतील गोलागुड्म परिसरातील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून खुलेआम पत्त्यांचा डाव रंगत आहे.

गडचिराेली : सिराेंचा तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाणे हद्दीतील गोलागुड्म परिसरातील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून खुलेआम पत्त्यांचा डाव रंगत आहे. पत्त्यांचा डाव खेळण्यासाठी शेजारच्या तेलंगणा राज्यातून जवळपास २०० जुगारी ७० ते ८० वाहने घेऊन आसरअल्ली परिसरात दाखल होत आहेत. या जुगाराच्या अड्ड्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सिरोंचा तालुक्यातील गोलागुडम हे गाव अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात मोडते. गोलागुडम गावाच्या हद्दीतील पातागुडम मार्गावर मागील अनेक दिवसांपासून अवैध जुगाराचा अड्डा सर्रासपणे सुरू आहे. सदर गाव तेलंगणा राज्यापासून जवळ असल्याने येथील जुगारी रोज तेलंगाणातून येतात. आसरअल्ली परिसर ग्रामीण असल्यामुळे या परिसरात शेती व्यावसायिक व मोलमजुरांची संख्या मोठी आहे. त्यांना जुगाराचा छंद जडल्यास संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याचा तसेच कर्जबाजारी होण्याचा धोका आहे. तसेच येथील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवरही याचा विपरीत परिणाम होणार आहे. पोलिस विभागाने तत्काळ जुगार अड्डा बंद करून जुगाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

 स्थानिकांनी केला निषेधआसरअल्ली पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या गोलागुडम गावाच्या हद्दीतील पातागुडम मार्गावर अवैधरीत्या लाखोंचा जुगार खेळला जात आहे. या जुगार अड्ड्यावर तेलंगणातून नागरिक मोठ्या प्रमाणात वाहन घेऊन भरधाव वेगाने येतात. या वाहनांच्या वेगामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. या जुगार अड्ड्याच्या विरोधात नागरिकांनी हातांत फलक घेऊन रस्त्यावर उतरून निषेध केला.बॉक्ससाठी...

पाेलिस लक्ष देतील काय?जुगार अड्ड्यावर कारवाई करून अवैध धंदे बंद करा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आसरअल्ली पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांना निवेदनातून केली आहे. निवेदन देताना माजी सभापती मोडेम सत्यम, टेकडामोटलाचे सरपंच हनुमंत समय्या कोय्याला, श्रीनिवास बापू मेडीर्जेज, समय्या बनय्या मोर्ला, राजू गणपत जैनवार, माजी उपसरपंच मोहनराव बनाया जाडी उपस्थित होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली