शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळाने बुजविले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 22:47 IST

अहेरी येथील आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी अहेरी शहरातील सर्व मुख्य मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवून धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यही केले आहे.

ठळक मुद्देलोकोपयोगी उपक्रम : अहेरीतील आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांचे श्रमदान

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : अहेरी येथील आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी अहेरी शहरातील सर्व मुख्य मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवून धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यही केले आहे. त्यांच्या या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली आहे.अहेरी शहरातील मुख्य रस्ता, उपजिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने या ठिकाणी नेहमीच अपघात घडत होते. परिणामी वाहनधारक कमालीचे त्रस्त होते. अहेरी येथील आझाद गणेश मंडळ लोेकोपयोगी उपक्रम राबविण्यास प्रसिद्ध आहे. यावर्षी या मंडळाने अहेरी शहरातील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या पदाधिकाºयांनी स्वत: काम करीत खड्डे बुजविले. सदर खड्डे बुजविण्यासाठी नगर पंचायतीला किमान ५० हजार रूपयांचा खर्च आला असता, मात्र हे काम आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी लोकवर्गणीतून गोळा झालेल्या पैशातून मोफत केले आहे. या उपक्रमात अहेरीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता पेदापल्लीवार, नगरसेवक अमोल मुक्कावार, आझाद गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, नगरसेविका अर्चना विरगोनवार, नगरसेवक शैलेंद्र पटवर्धन, गिरीश मद्देर्लावार, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, महेश बेझंकीवार, लचय्या गद्देवार, पोलीस निरीक्षक सुरेश मदने, संतोष जोशी, अहेरी व्यापारी मंडळाचे प्रशांत आर्इंचवार, कारूसेठ रोहरा, दोंतुलवार, ंबबलू येनमवार, अनुराग बेझलवार, मयूर गुम्मलवार, संदीप गुम्मलवार, मयूर चांदेकर, अक्षय कवीराजवार, सचिन मल्लेलवार, मोनू पारेल्लीवार, अमोल वडनेरवार यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले.गणेशोत्सवासाठी बहुतांश पैसा लोकवर्गणीच्या माध्यमातून गोळा केला जातो. मात्र सदर पैसा डीजे, विद्युत रोषणाई, बँड, दारू यासारख्या अनावश्यक बाबींवर खर्च केला जातो. या सर्व खर्चाला फाटा देत आझाद गणेश मंडळाने रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा निर्णय अतिशय प्रेरणादायी ठरला आहे.आष्टीत डीजेविनाच विसर्जनआष्टी येथे चार वॉर्डात सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. डीजे व बँडवर लाखो रूपयांची उधळपट्टी होते. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. त्यामुळे यावर्षी डीजे किंवा बँडविनाच गणेश विसर्जन करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. विसर्जनादरम्यान पारंपरिक वाद्य वाजविले जाणार आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला आष्टी येथील नवतरंग गणेश मंडळ, शहीद वीर भगतसिंग गणेश मंडळ, श्री साई गणेश मंडळाने सकारात्मक परिणाम दर्शविला आहे. यावेळी आष्टीचे ठाणेदार दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक नितेश गोहणे, संदीप कापडे, संदीप शिंगटे, विजय जगदाडे, अशोक खंडारे आदी उपस्थित होते. आष्टी येथील गणेश मंडळांनी घेतलेल्या या निर्णयाचे जिल्हाभरात स्वागत होत आहे.