शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनाने गाेंडवाना विद्यापीठाचे कामकाज ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

काळी फित आंदोलन, एक दिवसाचा लाक्षणिक संप, त्यानंतर १३ व १४ डिसेंबर रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयात साखळी उपोषण करण्यात आले हाेते. त्यानंतर आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदाेलनात विद्यापीठात कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच  गोंडवाना  विद्यापीठ  अधिकारी व कर्मचारी संघटना या दोन्ही  संघटनेचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी सहभागी सहभागी झाले आहेत. परिणामी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडले  आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली :  विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी १६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारले हाेते. याचाच एक टप्पा म्हणून कर्मचाऱ्यांनी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे.महाराष्ट्र महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे १६ नोव्हेंबर २०२१ पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू आहे. काळी फित आंदोलन, एक दिवसाचा लाक्षणिक संप, त्यानंतर १३ व १४ डिसेंबर रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयात साखळी उपोषण करण्यात आले हाेते. त्यानंतर आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदाेलनात विद्यापीठात कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटना तसेच  गोंडवाना  विद्यापीठ  अधिकारी व कर्मचारी संघटना या दोन्ही  संघटनेचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी सहभागी सहभागी झाले आहेत. परिणामी विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज ठप्प पडले  आहे.

मंत्र्यांनी आश्वासन पाळले नाहीप्रलंबित असलेल्या समस्यांच्या संदर्भात संबंधित खात्याच्या मंत्र्यांना व अधिकाऱ्यांना सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने महिनाभरापूर्वी निवेदन देण्यात आले. सदर निवेदनातून कर्मचाऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून त्यांची पूर्तता करण्यात यावी, अन्यथा राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठांतील त्रस्त कर्मचारी आंदोलन करतील, अशी पूर्वसूचनाही देण्यात आली. तरीसुद्धा दुर्लक्ष करण्यात आले. मंत्र्यांनी संघटनेला आश्वासन दिले हाेते; परंतु शब्द पाळला नाही, असा आराेप संघटनेने केला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय शासनाने पुनर्जीवित करावे, सातव्या वेतन आयोगाच्या ५८ महिन्यांच्या फरकाची रक्कम द्यावी, १०-२०-३० लाभांची आश्वासित प्रगती योजना शासनाने लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ द्यावा, यासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचारी आंदाेलन करीत आहेत.

 

टॅग्स :universityविद्यापीठ