शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

गांधी विचारात सर्वच समस्यांवरील उपाय

By admin | Updated: August 13, 2016 01:42 IST

महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत.

पोलीस अधीक्षकांचे प्रतिपादन : आत्मसमर्पितांसाठी ‘गांधी शांती विचार परीक्षा’ गडचिरोली : महात्मा गांधींनी जगाला दिलेल्या शांतीच्या विचारांमध्ये सर्वच समस्यांवरील उपाय आहेत. हे विचार प्रत्येक व्यक्तीने अंगीकारले पाहिजे. माओवादी व महात्मा गांधी यांच्या विचारसरणीत फार मोठे अंतर आहे. आत्मसमर्पण केलेल्या व्यक्तींच्या मनातून माओवादी व हिंसावादी विचार कायमचे काढून टाकण्यासाठी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या व्यक्तींनी ही परीक्षा दिली आहे. त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले. आत्मसमर्पित नक्षल्यांना शांतीच्या मार्गाने जीवन जगता यावे, यासाठी आदर्श मित्र मंडळ पुणे, लक्ष्मीनृसिंह पतसंस्था बल्लारपूर व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा पोलीस मुख्यालयात शुक्रवारी गांधी शांती विचार परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत सहभागी झालेल्या आत्मसमर्पितांना प्रमाणपत्र व पदकाच्या वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, लक्ष्मीनृसिंह पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास सूंचुवार, अप्पर पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे, एसडीपीओ डॉ. सागर कवडे, परीक्षाविधीन एसडीपीओ डॉ. रणजित पाटील, पोलीस उपअधीक्षक गृह गणेश बिरादार, परीक्षा समन्वयक लक्ष्मण बोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ५६ आत्मसमर्पितांनी सदर परीक्षा दिली. परीक्षेपूर्वी या सर्वांना गांधी विचारांचे पुस्तक देण्यात आले. त्याचबरोबर गांधीजींच्या शांतीच्या मार्गाविषयी मार्गदर्शन सुध्दा करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना उदय जगताप यांनी चुकीच्या विचारांमुळे येथील आदिवासी युवक व जनता भरकटली जात आहे. मार्ग अनेक असले तरी योग्य मार्गाची निवड करण्याचा शहाणपणा प्रत्येक व्यक्तीने दाखविला पाहिजे. गांधी विचारानंतर आत्मसमर्पितांचे मतपरिवर्तन झाले असून त्यांनी शांतीदूत म्हणून काम करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक एसडीपीओ डॉ. सागर कवडे, संचालन पीएसआय तेजस्वी पाटील, आभार पीएसआय राजपूत यांनी मानले. (नगर प्रतिनिधी) क्रिष्णा व रघुने उलगडला नक्षल चळवळीतील फोलपणा अहिंसेच्या मार्गाने काहीच साध्य होत नाही. सत्ता प्राप्त करण्यासाठी हिंसेचा मार्ग स्वीकारावाच लागतो, अशी शिकवण नक्षल्यांकडून दिली जाते. त्याचबरोबर मोठमोठी स्वप्न दाखविली जातात. या विचारांना बळी पडून आदिवासी युवक नक्षल चळवळीमध्ये सहभागी होते. नक्षल चळवळीत प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर या चळवळीतील फोलपणा लक्षात येते. वरिष्ठांचे आदेश पाळत जंगलात व पहाडांवर रात्रंदिवस फिरावे लागते. कधी-कधी दोन ते तीन दिवस उपाशी राहण्याचे संकटही झेलावे लागत असल्याचे सत्य आत्मसमर्पित क्रिष्णा मासा दोरपेटी व रघु लालसाय सडमेक यांनी बोलून दाखविले.