शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुदृढतेसाठी खेळ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:04 IST

शाळेतील संस्कारच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वृद्धिंगत होते. त्यामुळे ज्ञानाची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सुदृढ आरोग्यासाठी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे यांनी केले.

ठळक मुद्देअनिल चिताडे यांचे प्रतिपादन : विद्यार्थ्यांनी व्यायामाकडे लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेतील संस्कारच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचे कार्य करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वृद्धिंगत होते. त्यामुळे ज्ञानाची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच सुदृढ आरोग्यासाठी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताडे यांनी केले.येथील शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील स्नेहसंमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डी. एम. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील, संस्थेचे सहसचिव डी. एन. चापले, सदस्य अरूण मुनघाटे, नाना म्हशाखेत्री, प्राचार्य जी. एम. दिवटे, उपमुख्याध्यापक डी. टी. मामीडवार, पर्यवेक्षक पी. एन. उरकुडे व शालेय छात्र संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.विद्यार्थी जीवनात मोबाईलचा वापर धोकादायक असून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर टाळावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी केले. सोशल मीडियाच्या गैरवापरातून घडत असलेल्या विविध गुन्ह्यांबद्दल इत्यंभूत माहिती देऊन पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डी. एम. म्हशाखेत्री यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दर्जेदार कार्यक्रमांचे कौतुक करून स्वत:तील सुप्त गुणांचे प्रदर्शन करण्याचे आवाहन केले.स्नेहसंमेलनादरम्यान घेण्यात आलेल्या सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अहवाल वाचन प्राचार्य जी. एम. दिवटे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन संजय निशाणे तर आभार उपमुख्याध्यापक डी. टी. मामीडवार यांनी मानले.