शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या ‘गोंडवाना’च्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:36 IST

गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. व लॉ. च्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश केला आहे.

ठळक मुद्दे बी.ए. व लॉ. चे विद्यार्थी करणार अध्ययनयावर्षीपासून बदल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए. व लॉ. च्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश केला आहे.गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत संलग्नित असलेल्या महाविद्यालयातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसह समाजामध्ये विवेकनिष्ठा, बुद्धीप्रामाण्यवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी विद्यापीठाने बी.ए. तृतीय वर्ष व विधीशास्त्राच्या पाच वर्षीय अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा अंतर्भाव केला आहे. बी.ए.तृतीय वर्षाच्या समाजशास्त्र विषयात सहाव्या सेमिस्टरसाठी दोन युनिटमध्ये जादुटोणा विरोधी कायद्याच्या अभ्यासक्रमाबाबत काही भाग समाविष्ट केला आहे.पाच वर्षीय विधीशास्त्र अभ्यासक्रमाच्या दहाव्या सेमिस्टरसाठी संपूर्ण दोन पाठ जादुटोणा विरोधी कायद्यासंबंधीत आहेत. तशी माहितीही गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून बी.ए.समाजशास्त्र विषय घेतलेले तसेच विधीशास्त्राला प्रवेश घेतलेले विद्यार्थी जादुटोणा विरोधी कायद्याचे अध्ययन करणार आहेत.जादुटोणा विरोधी कायद्याच्या गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी मागणी विद्यापीठाच्या विधीसभेचे सदस्य अ‍ॅड.गोविंद भेंडारकर यांनी केली होती. ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारी सदस्य म्हणून कार्यरत असून या समितीच्या चंद्रपूर शाखेचे अध्यक्षही आहेत.गोंडवाना विद्यापीठाने अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश केल्याने या विद्यापीठाला पुरोगामी विद्यापीठ म्हणता येईल.

अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होणारअंधश्रद्धेतून आजारावर उपचार न करणे, भोंदूबाबाच्या मागे लागून फसवणूक करून घेणे, गुप्त धनासाठी विकृत प्रकार करणे, नरबळी आदीसारखे प्रकार घडत आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादुटोणा विरोधी कायद्याचा समावेश करण्यात आल्याने विद्यार्थी आपल्या कुटुंबासह समाजात ज्ञानाचा वापर करू शकतात. परिणामी जनजागृती करून समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यास मदत होणार आहे. शिवाय समाजातील अंधश्रद्धाही दूर होण्यास मदत होईल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र