शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीचे हत्ती जाणार गुजरातच्या ‘अंबानी झू’ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 17:29 IST

एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी ही अनमोल सरकारी मालमत्ता देण्याच्या या खटाटोपाबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

मनोज ताजने लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : संपूर्ण राज्यभरात हत्तींना पाहण्यासाठी एकमेव आकर्षण असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात आले आहे; कारण कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून सात हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी ही अनमोल सरकारी मालमत्ता देण्याच्या या खटाटोपाबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुजरातच्या जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देशातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. या खासगी प्राणिसंग्रहालयासाठी देशभरातून विविध वन्यप्राणी मागविले जात आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून अनेक ठिकाणचे दुर्मीळ प्राणी या प्राणिसंग्रहालयासाठी देण्याची अनुमतीही दिली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून ७ पैकी ४ हत्ती, तर आलापल्लीतील ३ हत्ती गुजरातला पाठविले जाणार आहेत. 

राज्य सरकारची उदासीनताकमलापूरमधील हत्तींच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळत नाही. हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पशुवैद्यकीय अधिकारीही नाही. गेल्या दोन वर्षांत या कॅम्पमधील तीन हत्तींची पिले आजारांनी मरण पावली. राज्यात एकमेव असलेल्या या हत्ती कॅम्पकडे सरकारने लक्ष दिल्यास गडचिरोलीतील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होऊ शकते.