शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीचा श्वास कोंडला ! शहरातील हवा प्रदूषित; गुणवत्ता निर्देशांक तिसऱ्या श्रेणीत

By गेापाल लाजुरकर | Updated: January 21, 2025 15:31 IST

Gadchiroli : हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत प्रदूषणात पडते भर

गोपाल लाजूरकर लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात हिरवीगार वनराई, बारमाही वाहणाऱ्या नद्या तसेच औद्योगिक क्षेत्राचा अभाव असल्याने १५ वर्षापूर्वी येथील हवा शुद्ध होती. आता जिल्ह्यातील वातावरण बदल झाल्याने येथील वायू गुणवत्ता निर्देशांक तिसऱ्या श्रेणीत घसरलेला आहे. जिल्ह्यातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.

जिल्ह्यात फारसे उद्योगधंदे नाहीत. कारखाने किंवा फॅक्टरी नाहीत, तरीसुद्धा जिल्ह्यातील वायू गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. 

प्रदूषण मोजणारी यंत्रणाच नाही; कारभार चंद्रपुरातून जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय तर नाहीच शिवाय येथील प्रदूषण मोजणारी यंत्रणाही नाही. चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयातून गडचिरोली जिल्ह्यातील कारभार चालविला जातो.

वायू गुणवत्ता निर्देशांक किती असावा? ५० पर्यंतचा वायू गुणवत्ता निर्देशांक शुद्ध हवेचा मानला जातो. ५१ ते १०० पर्यंतचा वायू गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक मानला जातो. तर १०१ ते २०० पर्यंतचा वायू गुणवत्ता निर्देशांक हवा प्रदूषित असल्याचे नोंद करतो.

गुणवत्ता निर्देशांक ११० जिल्ह्याचा वायू गुणवत्ता निर्देशांक १०१ ते १५० च्या दरम्यान आहे. यापूर्वी हा निर्देशांक १०० च्या आतच होता. वायू निर्देशांकाच्या दृष्टीने जिल्ह्यातील वायू शुद्धीकरणाची स्थिती समाधानकारक होती; विविध कारणांमुळे प्रदूषण वाढले.

२.५ मायक्रोमीटर प्रदूषणासाठी धूळ, धूर ठरताहेत कारणीभूतसूक्ष्म धुलीकण श्वसनाद्वारे शरीरात जातात. श्वसनाचे तसेच फुफ्फुसाचे आजार वाढतात.

"एकेकाळी शुध्द हवेचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीची भविष्यात प्रदूषित जिल्हा म्हणून ओळख निर्माण व्हायला वेळ लागणार नाही." - प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ 

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणGadchiroliगडचिरोली