शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli: गीताली गाव दारूमुक्त करण्यासाठी महिलांनी उचलला विळा, ५६ ड्रम सडव्यासह २२० लिटर दारू नष्ट

By दिलीप दहेलकर | Updated: December 12, 2023 15:07 IST

Gadchiroli News: मुलचेरा तालुक्याच्या गीताली गावात दारूमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर आळा घालण्यासाठी दारूविक्री बंद करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात येताच गावातील महिलांनी गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचा विळा उचलला आहे.

- दिलीप दहेलकर गडचिरोली  - मुलचेरा तालुक्याच्या गीताली गावात दारूमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर आळा घालण्यासाठी दारूविक्री बंद करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात येताच गावातील महिलांनी गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचा विळा उचलला आहे. आतापर्यंत गाव संघटनेने मुक्तिपथ व पोलिस विभागाच्या सहकार्याने वेगवेगळया दिवशी कृती करून ५६ ड्रम सडव्यासह २२० लिटर दारू नष्ट केली आहे. तसेच अनेक दारू विक्रेत्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला.

शांतीग्राम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गीताली या गावात आयोजित गावसभेत दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थांनी गावात फेरी काढली. सोबतच दारूविक्रेत्यांच्या घरावर धडक देऊन विक्रेत्यांना नोटीस बजावीत दारूविक्री बंद करण्याची सूचना केली. तसेच दारूविक्रेत्यांना नोटीस सुद्धा बजावली. तरीसुद्धा गावातील काही विक्रेत्यांनी जंगल परिसरात मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे मुक्तिपथ व  गाव संघटनेच्या महिलांनी विविध दिवशी अहिंसक कृती करीत विक्रेत्यांचा आतापर्यंत ५६ ड्रम मोह सडवा व २२० लिटर दारू नष्ट केली.

गावाला दारूविक्रीमुक्त करण्याचा विळा गाव संघटनेच्या महिलांनी उचलला आहे. त्याअनुषंगाने महिलांची मोहीम सातत्याने सुरू असून दारू विक्रेत्यांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. या मोहिमेत ग्रा.पं.सदस्य सिमा मजुमदार, पोलिस पाटील बील्लो विश्वास, पौर्णिमा बैरागी, ग्राम संघ सचिव रेणुका मुखर्जी, शांती नितीन जोद्दार, पिंकी मंडल, विशाखा सरदार, पार्वती रप्तान, शांती धिरेन जोद्दार, ममता सरकार, शिखा विश्वास, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, स्पार्क कार्यकर्ती समिक्षा कुळमेथे यांच्यासह गाव संघटनेच्या महिला सदस्य सहभागी झाल्या.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली