शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली शहरात होणार सव्वा कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:55 IST

गडचिरोली नगर परिषदेला प्राप्त झालेल्या नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून सुमारे १ कोटी १५ लाख ५३ हजार ९२९ रूपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदा काढली असून सदर कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देनाली व रस्त्यांचे बांधकाम : दलितेतर वस्ती सुधार योजनेचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेला प्राप्त झालेल्या नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून सुमारे १ कोटी १५ लाख ५३ हजार ९२९ रूपयांची कामे केली जाणार आहेत. या कामांची निविदा काढली असून सदर कामे लवकरच सुरू होतील, अशी माहिती नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी दिली आहे.मंजूर झालेल्या कामांमध्ये धानोरा मार्ग ते साई ग्राफिक्सपर्यंत रस्त्याचे खडीकरण करणे व नाली बांधकाम करणे, यासाठी ९ लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. आरमोरी मार्ग ते अप्पलवार दवाखान्याकडून राधिका रेस्टॉरेंटपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासाठी ८ लाख ५२ हजार ४०० रूपयांचा निधी मंजूर आहे. अविनाश खेवले ते मेश्राम ते अहिरकर यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम केले जाणार आहे. त्यासाठी ७ लाख ६६ हजार रूपये मंजूर आहेत. फाले यांच्या घरापासून सज्जनपवार यांच्या घरामागील नालीचे बांधकाम केले जाणार आहेत. त्यासाठी ४ लाख ५ हजार ६०० रूपयांचा निधी मंजूर आहे.बोरमाळा नदीघाट रस्त्याचे डांबरीकरण व नूतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी ५८ लाख ४० हजार रूपयांचा निधी मंजूर आहे. पटेल सायकल स्टोअर्स ते बाबनवाडे यांच्या बिल्डिंगपर्यंत नाली बांधकाम व स्लॅब ड्रेनचे काम केले जाणार आहे. त्यासाठी १३ लाख ७ हजार रूपये मंजूर आहेत. कारमेल हायस्कूलच्या मागे वासेकर ते बायपास, अप्पलवार ते चांबुलवार ते साखरे यांच्या घरापर्यंत काँक्रिट नालीचे बांधकाम केले जाणार आहे. या कामासाठी १४ लाख ७५ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही सर्व कामे १ कोटी १५ लाख ५३ हजार रूपयांची आहेत. सदर कामांची निविदा निघाली असल्याने ही कामे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.लवकरच होणार कामांना सुरुवातप्रशासकीय मान्यतेनंतर दलितेत्तर वस्ती सुधार योजनेच्या कामांची निविदा काढण्यात आली आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी रस्ता, नालीचे बांधकाम केले जाणार असल्याने संबंधित वॉर्डांमधील रस्त्यांची समस्या दूर होण्यास मदत होईल.दलित वस्तीत ५४ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यतादलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१६-१७ या वर्षात गडचिरोली नगर परिषदेला २ कोटी ३१ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी १ कोटी ७७ लाख रूपयांचा निधी यापूर्वीच खर्च झाला. ५४ लाख ९ हजार रूपयांचा निधी शिल्लक होता. सदर निधीतून विकास कामे करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून हजारे आटा चक्की ते रामटेके यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करणे, गंदेवार ते चामोर्शी मार्गापर्यंत सिमेंट काँक्रिटचे रोड करणे, साईनाथ साळवे ते गाळे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता, खडीकरण व मुरूम टाकण्याचे काम केले जाणार आहे. दुर्गे ते कोठारे ते हजारे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण केले जाणार आहे. प्रभाग क्र. ४ मध्ये खुल्या जागेचे सौंदर्यीकरण होईल. एमआयडीसी, बसेरा कॉलनीतील रस्त्यांचे खडीकरण, वॉर्ड क्र. २३ मधील अरविंद सोनुले ते विनोद वाढई यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट मार्ग, वॉर्ड क. १६ मध्ये अर्चना फुलझेले ते सुनील गोंगले यांच्या घरापर्यंत खडीकरण, नाली, वॉर्ड क्र. १५ मधील चंद्रपूर मार्ग ते भांडेकर यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण होणार आहे.