शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत प्रशिक्षण केंद्र

By admin | Updated: January 3, 2016 02:04 IST

गडचिरोली जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शेतकरी बचतगटांना कृषी यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.

कृषी यंत्रांची दुरूस्ती : शासनाकडे अहवाल केला सादरगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शेतकरी बचतगटांना कृषी यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. या यंत्रांच्या दुरूस्तीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यांसाठी गडचिरोली येथे अवजारे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाची हिरवी झेंडी मिळाल्यास पुढील दीड महिन्यात सदर प्रशिक्षण केंद्र गडचिरोली येथे सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व आदिवासी विकास विभागाच्या निधीतून गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गटांना धान रोवणी यंत्र, कोनोविडर, नागर, पॉवर ट्रिलर, धान कापणी यंत्र आदींचे वितरण करण्यात आले आहे. सदर सर्व यंत्र गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन आहेत. त्यामुळे एखादेवेळी थोडाफार तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास कंपनीच्या व्यक्तीची वाट बघावी लागते. परिणामी कामाचा खोळंबा होत आहे. दोन वर्षानंतर कंपनीचा माणूसही दुरूस्तीसाठी येणार नाही. त्यामुळे यंत्र दुरूस्तीची समस्या गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचे वाटप केले आहे. या चारही जिल्ह्यांसाठी गडचिरोली हा मध्यवर्ती जिल्हा ठरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीला मंजुरी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर सोनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाचे उपसंचालक विजय कोळेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली आहे. (नगर प्रतिनिधी)