शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; दारूमुक्त निवडणुकीला गडचिरोलीतील नऊ उमेदवारांचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 18:24 IST

गडचिरोली विधानसभा मतदार संघातील नऊ उमेदवारांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही असे सांगत दारूबंदीला माझे समर्थन आहे असे लेखी वचन दिले आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीतील दारूबंदीलाही दिले समर्थनमुक्तीपथचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी विधानसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या व अपक्ष मिळून नऊ उमेदवारांनी दारूमुक्त निवडणुकीच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणुकीदरम्यान मतदारांना दारूचे प्रलोभन देणार नाही आणि दारूचा वापर करणार नाही असे सांगत दारूबंदीला माझे समर्थन आहे असे लेखी वचन दिले आहे.जिल्ह्यातील ६०० गावांनी आपापल्या गावात दारूबंदी लागू केली आहे. १२० ग्रामपंचायतींच्या २८७ गावांनी ग्रामसभेत दारूमुक्त निवडणूक घेण्याचा ठराव पारित केला. उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान दारूचा वापर करू देणार नाही, दारूचा स्वीकार करणार नाही, तसेच शुद्धीत राहूनच मतदान करणार, असे ठराव त्यांनी घेतले आहेत.गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये दारूमुक्त निवडणूक घेण्यासाठी महिला, युवा व पुरु ष मतदारांनी रॅली काढून, सभा घेऊन उमेदवारांना दारूमुक्त निवडणुकीसाठी आवाहन केले. सोबतच दारूबंदीला समर्थन करण्याचे वचन लिहून देण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानाचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत आरमोरी विधानसभा मतदार संघातील कृष्णा गजबे, गडचिरोली मतदार संघातील डॉ. देवराव होळी, डॉ.चंदा कोडवते, गोपाल मगरे, जयश्री वेळदा, सागर कुंभरे तर अहेरी विधानसभा मतदार संघातील धर्मरावबाबा आत्राम, दीपक आत्राम, लालसू नोगोटी या उमेदवारांनी संकल्प लिहून दिला. लिखित वचनासोबत त्यांनी व्हिडिओवर देखील वचन पक्के केले आहे. या अभियानामुळे दारूमुक्त निवडणूक तसेच दारूबंदी या दोन्हींना बळकटी मिळाली.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोलीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019