शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत सॉमिल जळून खाक

By admin | Updated: November 16, 2016 02:00 IST

येथील आरमोरी मार्गावरील राजूरकर यांच्या आरामशिनला सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.

जवळपास सात लाखांचे नुकसान : सोमवारच्या रात्रीची घटना; कारण गुलदस्त्यातगडचिरोली : येथील आरमोरी मार्गावरील राजूरकर यांच्या आरामशिनला सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आरामशिन व सागवान लाकडे जळून खाक झाल्याने जळपास सात लाख रूपयांचे नुकसान झाले.आरमोरी मार्गावर राजूरकर यांच्या मालकीचे उमाकांत सॉ मिल आहे. सध्या हे सॉ मिल कोल्हे यांना चालविण्यासाठी भाड्याने देण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास आरामशिन असलेल्या ठिकाणी आग लागली. राजूरकर यांचे घर आरामशिनच्या बाजुलाच आहे. या आरामशिनच्या घरावरूनच राजूरकर यांच्या घराला वीज पुरवठा करणाऱ्या वायर गेला आहे. आग लागताच घरातील वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे राजूरकर कुटुंबिय बाहेर निघाले असता, आरामशिनला आग लागल्याचे दिसून आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. याबाबतची माहिती तत्काळ गडचिरोली येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग आटोक्यात येण्यास अडचण येत होती. एका अग्निशमन दलाच्या वाहनाने आग विझविणे शक्य नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर गडचिरोली येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी देसाईगंज येथीलही वाहन बोलविण्याचा सल्ला दिला. गडचिरोली व देसाईगंज येथील दोन्ही वाहनांनी मिळून सुमारे नऊ टँकर पाणी टाकले. पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आली. या आगीत आरामशिनचे साहित्य, जवळपासची लाकडे जळून खाक झाली. आरामशिनचे छतही कोसळले. पहाटेला फिरायला जाणाऱ्या नागरिकांना ही घटना माहित होताच सकाळी जळलेली आरामशिन पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. आरामशिनच्या बाजुलाच दोन जेसीबी मशीन उभ्या होत्या. आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याबाबतची तक्रार गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)