शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या भीतीने गडचिरोलीत खळबळ

By admin | Updated: August 12, 2016 00:43 IST

सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी, पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी...

अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ वाहतूक ठप्प : सुटकेसमध्ये स्फोटक नसल्याचे झाले निष्पन्न गडचिरोली : सकाळी ११.३० वाजताची वेळ. गडचिरोली शहरातून शाळेसाठी निघालेले विद्यार्थी, पाच किमी अंतरावर कॉम्प्लेक्स परिसरात आॅफीस पकडण्यासाठी लगबगीने निघालेले पुरूष व महिला कर्मचारी अशा स्थितीतीच शेकडो वाहनांची वर्दळ सुरू असताना गडचिरोली शहराचा मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात बेवारस स्थितीत सुटकेस असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बीडीडीएस पथकाने तत्काळ चौकाचा ताबा घेऊन सुटकेस आपल्या ताब्यात घेतली व निर्जनस्थळी नेऊन ही सुटकेस उघडली. त्यात काहीही नसल्याचे निष्पन्न झाले व गडचिरोलीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. इंदिरा गांधी चौकात बेवारस सुटकेस असल्याची माहिती मिळताच तत्काळ पोलीस विभागाची सारी यंत्रणा कामाला लागली. छत्तीसगडकडे जाणाऱ्या धानोरा, चामोर्शी, नागपूर, चंद्रपूर मार्गावरची वाहतूक तत्काळ थांबविण्यात आली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास हा थरार चालला. त्यानंतर पोलीस विभागाचे बीडीडीएस पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधपथकाचे शेकडो कर्मचारी या कामी लागलेत. दोन पथदिव्यांना दोरी बांधण्यात आली. नंतर या दोरीच्या सहाय्यानेच सुटकेस पोलिसांच्या टेम्पो वाहनामध्ये अलगद उचलून टाकण्यात आली. तोपर्यंत संपूर्ण उपस्थितांच्या छातीचे ठोके धडधडत होते. गडचिरोलीत बॉम्ब आढळला, बॉम्ब कुणी ठेवला असेल, अशा चर्चा सुरू झाल्या. सोशल मीडिया, व्हॉटस्अपवरून घटनास्थळाचे फोटोही पाठविण्यास उत्साही लोकांनी सुरूवात केली. ही बातमी राज्याच्या कानाकोपऱ्यात हवेसारखी पसरली. अखेरीस बीडीडीएस पथकाने निर्जनस्थळी नेऊन ही सुटकेस उघडली. त्यामध्ये काहीही मिळून आले नाही, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी तेजस्वीनी पाटील यांनी दुपारीच दिली. या घटनेमुळे गडचिरोलीसह राज्याच्या विविध भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांना पेव फुटले होते. त्यानंतर तत्काळ पोलीस विभागाने सदर माहिती जाहीर केली. सुटकेस हस्तगत केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. मात्र दिवसभर या घटनेची चर्चा होती. लोकमत कार्यालयातही अनेक जण विदर्भातून या घटनेबाबत विचारणा करीत होते. अफवांचा बाजार दिवसभर चालला. मात्र एवढ्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित असतानाही सुटकेस कुणी आणून ठेवली असावी, हा अतिशय गंभीरच विषय आहे. (नगर प्रतिनिधी)