शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली शहरात ४१ हजार ५० रूपयांची दारू जप्त

By admin | Updated: February 26, 2016 01:44 IST

गडचिरोली शहरातील भडांगे मोहल्ला व सर्वोदय वार्डात गुरूवारी पोलिसांनी धाड घालून तीन दारू विक्रेत्यांकडून ४१ हजार ५० रूपयांचा माल जप्त केला आहे.

गडचिरोली : गडचिरोली शहरातील भडांगे मोहल्ला व सर्वोदय वार्डात गुरूवारी पोलिसांनी धाड घालून तीन दारू विक्रेत्यांकडून ४१ हजार ५० रूपयांचा माल जप्त केला आहे. या तीन दारू विक्रेत्यांवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शहरातील या दारू विक्रेत्यांनी दोन एलपीजी सिलिंडरला होल (छिद्र) करून त्यात दारूच्या निपा ठेवल्या होत्या.भडांगे मोहल्ला येथील मंदाबाई श्रीहरी वांढरे (५०) व किशोर पंजाब जुमडे (२६) यांच्याकडून पोलिसांनी विदेशी दारूच्या १० हजार ५०० रूपयांच्या ४२ निपा, मॅकडोनाल कंपनीच्या २ हजार १०० रूपयांच्या सात निपा व देशी दारूच्या १६ हजार ७५० रूपयांच्या ३३५ निपा असा एकूण २९ हजार ३५० रूपयांचा माल जप्त केला. मंदाबाई वांढरे, किशोर जुमडे या दोघांवर गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर सर्वोदय वार्डातील कुंदा रवी कोंडावार (५०) हिच्याकडून विदेशी दारूच्या ७ हजार ५०० रूपयांच्या ३० निपा मॅकडोनाल दारूच्या ४ हजार २०० रूपयांच्या १४ निपा असा ११ हजार ७०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. हिच्याविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)