शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शासनाविरोधात विदर्भवाद्यांचा गडचिरोलीत आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:59 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाभरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती : स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा

ऑनलाईन लोकमत गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले. सभेनंतर खा. अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यासाठी मोर्चा नेत असताना गडचिरोली पोलिसांनी या विदर्भवादी मोर्चेकºयांना जि.प. माध्यमिक शाळेजवळ मोर्चाला थांबविले. या आंदोलनादरम्यान विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांनी शासनावर जोरदार टीका केली.या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, अ‍ॅड. वामनराव चटप, रंजना माकर्डे, नितीन भागवत, गडचिरोलीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे आदींनी केले. इंदिरा गांधी चौैकात झालेल्या सभेत विदर्भवादी नेत्यांनी विद्यमान राज्य सरकारवर विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्यावर जोरदार ताशेरे ओढले. राज्य होण्यास विदर्भ सक्षम असतानाही सरकार विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्याला बगल देत आहे, असा आरोपही विदर्भवादी नेत्यांनी यावेळी केला.आंदोलनात अशोक पोरेड्डीवार, वामन जुआरे, नामदेव लांडे, घिसू खुणे, अमिता मडावी, चंद्रशेखर भडांगे, देवराव म्हशाखेत्री, पांडुरंग घोटेकर, प्रकाश ताकसांडे, नाामदेव गडपल्लीवार, रमेश उप्पलवार, गोवर्धन चव्हाण, रघुनाथ तलांडे, राजेंद्रसिंह ठाकूर, चंद्रशेखर गडसुलवार, कमलेश भोयर, दत्तात्रय बर्लावार, जगदीश बद्रे, रूचित वांढरे, शालिक नाकाडे, एजाज शेख, बाळू मडावी, मनीषा सज्जनपवार, सोनाली पुण्यपवार, मनीषा दोनाडकर, दादाजी चुधरी, सुधाकर डोईजड, जनार्धन साखरे यांच्यासह जिल्हाभरातील विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.आता विदर्भ असक्षम कसा?तीन वर्षांपूर्वी निवडणुकीदरम्यान विदर्भ नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यास काही अडचण नाही. स्वतंत्र राज्यासाठी विदर्भ सक्षम आहे, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र आता तीन वर्षानंतर स्वतंत्र राज्य होण्यासाठी विदर्भ असक्षम आहे, असे नेते सांगत आहेत, असे वामनराव चटप म्हणाले.