शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मलिकांच्या अटकेचे गडचिरोलीत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यामुळे नैतिकता म्हणून तसेच कायदेशीर बाब म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. मलिक यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी जाहीर केले.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर केंद्रीय एजन्सी ‘ईडी’ने सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी इंदिरा गांधी चौकात घोषणा देऊन त्यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या धोरणांचा जे लोक सक्षमपणे विरोध करीत आहेत, त्या लोकांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. ईडीद्वारे लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसताना मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे म्हणत निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या.या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,  युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,  सेवादलाचे अध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभूळकर, इंद्रपाल गेडाम, प्रमिला रामटेके, विवेक बाबनवाडे, मीनल चिमूरकर, अमोल कुळमेथे, संध्या उईके, आरती कोल्हे, समीर उंदीरवाडे, चेतन गद्देवार, सूरज नांदगावे, प्रमोद गुंड्डावार, अमर खंडारे, प्रा. चंद्रशेखर गडसूलवार, अमोल पवार, सविता चव्हाण, सुषमा येवले, हिमांशू खरवडे, चेतन पेंदाम, सांकेत जंगनावर, रजित रामटेके, आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

 मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर-    गडचिरोली : राज्य मंत्रिमंडळातील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यामुळे नैतिकता म्हणून तसेच कायदेशीर बाब म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी भारतीय जनता पक्षाकडून इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. मलिक यांनी राजीनामा न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी जाहीर केले.

-   यावेळी पिपरे यांच्यासह किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेश भुरसे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम, त्याचे साथीदार आणि मुंबईतील अंडरवर्ल्डच्या कारवायांशी संबंधित बेकायदेशीर सावकारी प्रकरणात मलिक यांची आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करून त्यांना ३ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठविण्यात आले.

-    या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष  अनिल पोहनकर, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, महिला आघाडी शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, केशव निम्बोड, राजू शेरकी, जनार्धन भांडेकर, भावना गड्डमवार, रूपाली सातपुते तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिक