शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत मातीच्या बिळात वेडाराघू पक्ष्यांनी थाटला संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 07:00 IST

गडचिरोलीत कोकडी गावापासून एक किमी अंतरावरून गाढवी नदी वाहते. नदी किनाऱ्यावरील वेडाराघू पक्ष्यांनी बिळ तयार केले आहेत. क्षणाक्षणातच जमिनीपासून ५ ते २० फुटावरून सतत गोलगोल उडताना हे पक्षी दिसतात. याच ठिकाणी नदीकाठाच्या पाळीवर मातीत वेडाराघू पक्ष्यांनी शेकडो बिळ खोदून स्वत:चे नैसर्गिक घरटे तयार केले आहेत.

ठळक मुद्देगाढवी नदी पाळीवर तयार केले घरटेसुरक्षित निवासाची व्यवस्था

अतुल बुराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पानवठ्याच्या परिसरात सहज आढळणाऱ्या वेढाराघू पक्ष्याचे घरटे (बिळ) पूर्णत: मातीचे सुरक्षित व नैसर्गिक असतात. गाढवी नदीच्या कोकडी नदी काठावरील पाळीवर मातीत बिळ तयार करून वेडाराघू पक्ष्यांची जगरहाटी सुरू आहे. विणीच्या हंगामात वेडाराघू पक्ष्यांनी तयार केलेले बिळ (घरटे) अचंबित करणारे असेच आहे.कोकडी गावापासून एक किमी अंतरावरून गाढवी नदी वाहते. नदी किनाऱ्यावरील वेडाराघू पक्ष्यांनी बिळ तयार केले आहेत. क्षणाक्षणातच जमिनीपासून ५ ते २० फुटावरून सतत गोलगोल उडताना हे पक्षी दिसतात. याच ठिकाणी नदीकाठाच्या पाळीवर मातीत वेडाराघू पक्ष्यांनी शेकडो बिळ खोदून स्वत:चे नैसर्गिक घरटे तयार केले आहेत. खचलेल्या पाळीच्या मातीवर एकही झाडेझुडूपे नाही. त्यामुळे खरटे तयार केलेल्या पाळीचा भाग आता झाडाझुडूपांपासून मुक्त आहे. येथे एक ते दोन फूट अंतरावर बिळ तयार केले आहेत. या बिळाचा व्यास ५ ते ७ सेंमी इतका आहे.प्रत्येक जीवाला जीवन जगताना स्वत:ची वंशवाढ झाली पाहिजे, अशी अपेक्षा असते. त्यात मानवासारखा बोलू न शकणारा पक्षी असुरक्षित असतो. त्यामुळे स्वत:चे रक्षण करून अंडे टाकण्यासाठी, पिलांचे संगोपन करणे, शिकारी पक्ष्यांपासून बचाव करण्यासाठी वेडाराघू पक्षी मातीत बिळ तयार करण्याचा मार्ग स्विकारतो. अंडीघालून पक्ष्याच्या जन्मापर्यंत बिळ तयार करण्याचे काम सुरू असते. विणीचा हंगाम चालू असेपर्यंत वेडाराघू पक्षी नदी किनाऱ्यावरील मातीच्या उभ्या पाळीवर बिळ तयार करतात. इवलासा वेडाराघू पक्षी आपल्या काळ्या चोचिने मातीत बिळ अर्थात घरटे तयार करतात. वेडाराघू हा कीटकभक्षी आहे. माशा, माकोडे, लहान-मोठे कीटक खाऊन तो जगत असतो.सदर पक्षी हा आकर्षक दिसत असून बऱ्याच नागरिकांचे लक्ष वेधून घेत असते. आपल्या परिसरात अनेक पक्षी असून ग्रामीण भागात चुकून त्यांची शिकार केली जाते. पक्ष्यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर लिखान व संशोधन केल्यास संवर्धन, संगोपन, संरक्षण होण्यास मदत होऊ शकते. यासाठी पक्षी मित्रांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

असा असतो वेडाराघू पक्षीवेडाराघू हा हिरवट रंगाचा पोपटासारखा दिसणारा लहान पक्षी आहे. सतत गोलगोल घिरट्या तो घालत असतो. लांब काळी चोच असून त्याचे पंख चकाकत असतात. शेपटीकडील भाग कोनासारखा असून कोनाच्या शिरोबिंदुतून बारिक, लहान सरळ तीर दिसतो. इकडून तिकडे उडणारा हा वेडाराघू पक्षी अतिशय चंचल असल्याचे जाणवत असते.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य