लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या ५१ शिक्षकांची मागील दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. विशेष म्हणजे, दिवाळीतही या शिक्षकांना वेतन मिळाले नाही.यावर्षीची दिवाळी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी आली होती. त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार शिक्षक वगळता नगर परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यातच त्या महिन्याचे वेतन झाले. मात्र शिक्षकांना वेतन मिळाले नाही. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यातही वेतन ऑक्टोबर महिन्याचे वेतन झाले नाही. तसेच डिसेंबर महिन्यातही ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांचे वेतन झाले नाही. नगर परिषद शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाकडून ९० टक्के अनुदान दिले जाते. १० टक्के अनुदान नगर परिषद स्वत:कडचे उपलब्ध करून देते. शासनाकडून नियमितपणे अनुदान प्राप्त होते. मात्र बºयाचवेळा नगर परिषदेचे अनुदान जमा केले जात नाही. त्यामुळे वेतन मिळण्यास विलंब होते. विशेष म्हणजे, शिक्षण विभागातील कर्मचारी सुध्दा फारसे लक्ष देत नसल्याचा आरोप शिक्षकांकडून होत आहे. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांनी लक्ष देऊन शिक्षकांचे वेतन वेळेवर होतील, याची व्यवस्था करावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.
गडचिरोली न.प.च्या शिक्षकांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : नगर परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या ५१ शिक्षकांची मागील दोन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. विशेष ...
गडचिरोली न.प.च्या शिक्षकांचे वेतन रखडले
ठळक मुद्देदिवाळीतही वंचित : दोन महिने विलंब