शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षल्यांकडून रोडरोलरची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:26 IST

नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली. 

 गडचिरोली - नक्षल्यांनी २५ मे रोजी महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात बंदचे आवाहन केले होते. कोरची शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. भामरागड तालुक्यातील कुमरगुडा गावात रोडरोलरला नक्षलवाद्यांनी आग लावली. 

पोलीस व नक्षलवादी यांच्यादरम्यान झालेल्या चकमकीत सुमारे ४० नक्षलवादी ठार झाले होते. या नक्षलवाद्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी नक्षल सप्ताहाचे आयोजन केले होते. २५ मे हा नक्षल सप्ताहाचा शेवटचा दिवस होता. या दिवशी बंद पाळण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले होते. जिल्ह्यातील इतर कोणत्याही भागात नक्षल बंदला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र कोरची येथे संपूर्ण दिवसभर बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. बस व खासगी वाहतूक सुध्दा ठप्प होती. कोरची तालुक्यातील दुर्गम भागातही बंद पाळण्यात आला. कोरची शहरात काही ठिकाणी दुकानांसमोर नक्षल्यांनी बॅनर बांधले होते. भामरागड तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावरील आलापल्ली मार्गावर असलेल्या कुमरगुडा येथील पोच मार्गाच्या खडीकरणाचे काम सुरू होते. दिवसभर काम केल्यानंतर रात्रीदरम्यान सर्व वाहने गावातून नेली जात होती. मात्र रोडरोलर हा गावातच ठेवण्यात येत होता. २४ मे च्या रात्री नक्षल्यांनी या रोडरोलरला आग लावली. यामध्ये रोडरोलरचे नुकसान झाले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीnewsबातम्या