शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

गडचिरोलीत पारा घसरला ६.४ अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 22:45 IST

आॅक्टोबरच्या अखेरीस सुरू झालेली हवीहवी वाटणारी गुलाबी थंडी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मात्र चांगलीच हुडहुडी भरवत आहे. या थंडीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३१ डिसेंबरला चांगलाच कहर केला. सोमवारी यावर्षीचे सर्वात कमी तापमान (६.४ अंश) नोंदविल्या गेले. अंग गारठून टाकणाऱ्या या थंडीतही युवा वर्गात नववर्षाच्या स्वागताचा उत्साह कमी झाला नसल्याचे चित्र सोमवारी रात्री सर्वत्र दिसत होते.

ठळक मुद्देयावर्षीच्या नीचांकी तापमानाची नोंद : हुडहुडीतही ठिकठिकाणी नववर्षाचे उत्साहात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आॅक्टोबरच्या अखेरीस सुरू झालेली हवीहवी वाटणारी गुलाबी थंडी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात मात्र चांगलीच हुडहुडी भरवत आहे. या थंडीने वर्षाच्या शेवटच्या दिवशी, अर्थात ३१ डिसेंबरला चांगलाच कहर केला. सोमवारी यावर्षीचे सर्वात कमी तापमान (६.४ अंश) नोंदविल्या गेले. अंग गारठून टाकणाऱ्या या थंडीतही युवा वर्गात नववर्षाच्या स्वागताचा उत्साह कमी झाला नसल्याचे चित्र सोमवारी रात्री सर्वत्र दिसत होते.जिल्ह्याच्या मोठ्या भुभागाला जंगलाने वेढले असल्याने ग्रामीण भागात थंडीची तीव्रता जास्त असते. परंतू काहीशी विरळ वस्ती असलेल्या गडचिरोली शहरातही बोचºया थंडीने सर्वांना गरम कपड्यांसोबतच शेकटीचा आसरा घेण्यासाठी प्रवृत्त केले. शेकोटीच्या आसºयाने चौकाचौकात गप्पांचे फड रंगत असल्याचे अनेक ठिकाणी दिसत होते. वयोवृद्ध नागरिकांना मात्र आपल्या घरातच शेकटी पेटवून ऊब घ्यावी लागत आहे.सोमवारी सायंकाळी थंडीमुळे आणि ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी बाजारपेठ लवकरच बंद झाली होती. मात्र ठिकठिकाणी पार्ट्यांची लगबग सुरू होती.स्वयंपाकघरातील कामे उन्हातसकाळची वेळी तमाम गृहिणी स्वयंपाकघरातील कामांमध्ये व्यस्त असतात. पण वातावरणातील गारव्यामुळे स्वयंपाकघरात राहणे कठीण होत असल्याने महिलावर्ग शक्य ती कामे उन्हात बसून करत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोमवारी काही गृहिणींनी तर चक्क आपल्या अंगणात गॅस सिलींडर आणून उन्हाची ऊब घेत स्वयंपाक उरकला.रुग्णालयात वाढतेय गर्दीथंडीचा कडाका काही जणांसाठी असह्यहोत आहे. त्यातून सर्दी, खोकल्याचा त्रास वाढला आहे. विशेषत: ५ वर्षाखालील बालकांना हा त्रास अधिक जाणवत असून रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे.

शाळकरी मुलांच्या पालकांची कसरतशाळकरी मुलांना सकाळच्या थंडीत अंथरूणातून बाहेर काढून शाळेची तयारी करताना पालकवर्गाला कसरत करावी लागत आहे. सकाळ पाळीतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही परिणाम झाल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.