शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीच्या शेतकऱ्यांनी घेतली गुजरातच्या श्वेतक्रांतीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दूध उत्पादनासाठी पोषक वातावरण असूनही जिल्ह्यात दुधाचे उत्पादन घेतले जात नाही. दूध उत्पादनातून आर्थिक विकास करणे कसे शक्य आहे याची प्रात्यक्षिकासह माहिती जाणून घेण्यासाठी ‘आत्मा’च्या पुढाकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शैक्षणिक सहल थेट दुग्धोत्पादनातून श्वेतक्रांती घडविणाऱ्या गुजरातमध्ये नेण्यात आली.जिल्ह्यातील पशुपालकांचे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास ...

ठळक मुद्देदुग्धोत्पादन वाढीचा प्रयत्न : ‘आत्मा’च्या पुढाकारातून प्रशिक्षण सहल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दूध उत्पादनासाठी पोषक वातावरण असूनही जिल्ह्यात दुधाचे उत्पादन घेतले जात नाही. दूध उत्पादनातून आर्थिक विकास करणे कसे शक्य आहे याची प्रात्यक्षिकासह माहिती जाणून घेण्यासाठी ‘आत्मा’च्या पुढाकारातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शैक्षणिक सहल थेट दुग्धोत्पादनातून श्वेतक्रांती घडविणाऱ्या गुजरातमध्ये नेण्यात आली.जिल्ह्यातील पशुपालकांचे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे आयोजन गुजरातमधील आणंद येथे ३० मार्च ते ५ एप्रिलदरम्यान करण्यात आले आहे. तेथील दूध व्यवसाय विकास मंडळाने पशुपालकांसाठी हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे. त्यात सहकार क्षेत्राद्वारे दूध व्यवसाय, पशुपालनासंदर्भातील तंत्रज्ञान, चारा पीके, जनावरांचे आजार, स्वच्छ दूध उत्पादन व दूधजन्य पदार्थांची निर्मिती या विषयांवर ३ दिवसांचा प्र्रशिक्षण कार्यक्रम ठेवला आहे.खेडा जिल्ह्यातील सहकारी प्राथमिक दूध सोसायटीला भेट व दूध उत्पादकांशी चर्चा, प्रसिद्ध अमुल ब्रँडचे खेडा जिल्हा दूध उत्पादक संघ व त्यांच्या प्रक्रिया प्रकल्पाला सोमवारी (दि.२) प्रशिक्षणार्थींनी भेट दिली.याप्रसंगी गडचिरोली येथील आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव, प्रशिक्षणार्थी डॉ.देवेंद्र मुनघाटे, प्रतिभा चौधरी, बाबुराव सारवे, प्रफुल्ल भांडेकर, गणेश ठाकरे, अनुराग भोयर असे ५० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.